केंद्र शासन विरोधात पोंभूर्णा बंद. #Close #congress

Bhairav Diwase
तीन कृषी विधेयकाला विरोध व आंदोलनकर्त्ये शेतकऱ्यांना पाठिंबा.
पोंभूर्णा:- केंद्रातील मोदी सरकारने पारीत केलेल्या शेतकरी विरोधी तीन कृषि विधेयकाला विरोध आणि मागील ११ महिन्यापासून दिल्ली येथे या विरोधात आंदोलन करीत असलेल्या शेतकरी समुदायाला पाठिंबा दर्शविण्यासाठी यांसोबत कामगार विरोधी कायदे, वाढती महागाई, बेरोजगारी यांच्या विरोधात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पोंभूर्णा तालुका व शहर काँग्रेस, पोंभूर्णा शहर राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने भारत बंद च्या अनुषंगाने पोंभूर्णा बंद चे आयोजन करण्यात आले. यात तहसीलदार मार्फत महामहीम राष्ट्रपती यांना निवेदन सादर करण्यात आले.
बदं च्या यशस्वीतेकरीता भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पोंभूर्णा तालूका अध्यक्ष कवडू कुंदावार, विनोद अहिरकर, अतिक कुरेशी,, दत्तू येल्लुरवार, जयंत टेकाम, रवि मरपल्लीवार, जयपाल गेडाम, अशोक सिडाम, हेमंत आरेकर, राजाराम मोहुर्ले, विनोद थेरे, भगिरथ झाडे, सोमेश्वर कुंदोजवार, निलकंठ नैताम, विनायक बुरांडे, वसंत मोरे, दौलत नेणारे,कवडु बोबाटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे भुजंग ढोले, जगन कोहळे,अशोक सातपुते, जयदेव मडावी,दिनेश नैताम , प्रितीश कुंदावार, सतीश बावणे, नरेंद्र गिरसावळे, अमोल देवताळे, नितीन आरबेडवार, बंजरग बल्लावार, प्रशांत झाडे, जितेंद्र चुधरी, किशोर अर्जुनकार, अशोक बुटले, एकनाथ रामगिरीवार,शुभम माडंवगडे, कवडु बोढे, व बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समावेश होतो.