बिबट्याच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू. #Death #Leopard


शीर धडावेगळे करून तोडले लचके.
(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
मुलचेरा (गडचिरोली):- गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा तालुक्यातील येल्ला या गावातील मुत्ता टेकुलवार (55 वर्ष) या इसमावर बिबट्याने हल्ला करून ठार केल्याची घटना आज शनिवारी सकाळी उघडकीस आली. त्यांच्या मृतदेहावर ताव मारणाऱ्या बिबट्याला गावकऱ्यांनी पाहिले. त्यांनी आरडाओरडा करताच बिबट्याने जंगलात धूम ठोकली. #Death #Leopard
टेकुलवार हे शुक्रवारी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास मासोळ्या पकडण्यासाठी बेडुक जमा करायला शेतातील विहिरीत उतरले होते. शेताला लागूनच जंगल आहे. त्यामुळे विहिरीतून बाहेर येताच त्यांच्यावर बिबट्याने हल्ला केला असावा. #Adharnewsnetwork
रात्रभर ते घरी परत न आल्याने पत्नीने सकाळी गावकऱ्यांसोबत शोधाशोध सुरू केली. शेतात टेकुलवार यांचे शीर आणि धड वेगळे झालेला मृतदेह आणि बिबट्या त्याच्याजवळ लचके तोडत असल्याचे गावकऱ्यांना दिसले. आरडाओरड केल्यानंतर बिबट्या पसार झाला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत