Click Here...👇👇👇

पोंभूर्णा तालुक्यातील आदिवासी कुटुंबांना खावटी अनुदान वाटप. #Pombhurna #Distribution #Khawatigrants

Bhairav Diwase

तालुक्यातील ३८ गावाकरिता ११५० खावटी किट प्राप्त.
(आधार न्यूज नेटवर्क पोंभुर्णा विशेष प्रतिनिधी) किशोर माहोरकर
पोंभूर्णा:- आदिवासींना विकासाच्या प्रक्रियेत आणण्यासाठी आणि त्यांना स्वतःच्या पायावर भक्कमपणे उभे करण्यासाठी राज्य सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजअंतर्गत व आदिवासी विकास विभागाचे माध्यमातून खावटी अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना थेट अनुदान वाटपाची सुरूवात पोंभूर्णा तालुक्यात करण्यात आली असून तालुक्यातील ३८ गावाकरिता ११५० खावटी किटचे वाटप पोंभूर्णा येथील आदिवासी मुंलीचे वसतीगृहातून करण्यात येत आहे. #Pombhurna #Distribution #Khawatigrants
कार्यक्रमाचे उद्घाटक पंचायत समिति सभापती अल्का आत्राम, कार्यक्रमाचे अध्यक्ष तहसिलदार डॉ. निलेश खटके, प्रमुख पाहुणे म्हणून माजी उपनगराध्यक्ष रजिया कुरेशी, रवि बुक्कावार यांची प्रमुख उपस्थिती होती. #Adharnewsnetwork
यावेळी तहसिलदार डॉ.निलेश खटके यांनी मार्गदर्शन करतांना म्हणाले कोरोनासंकटामुळे अनेकांच्या हातचे काम गेले आहे.अर्थचक्राचे गणित बिघडल्यामुळे जगण्यावरही याचे फार मोठे परिणाम झाले आहे. शहरासोबतच ग्रामिण भाग व विशेषतः आदिवासी बहूल भागात लाॅकडाऊनचा मोठा फटका बसला आहे.आदिवासी कुटुंबाना दिलासा देण्यासाठी शासनातर्फे खावटी अनुदान योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेमुळे आदिवासी कुटुंबांना अल्पशी का असेना पण यातून मदत होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.आदिवासींना स्वावलंबी बनवण्यास शासन कटिबद्ध असून आदिवासी विकास विभागाच्या मार्फतीने अनेक योजना शासनस्तरावरून राबविण्यात येत आहेत. याचा फायदा नक्कीच होईल असे मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
या योजनेमध्ये लाभार्थ्यांना दोन हजार रुपये रोख स्वरुपात त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आले असून दोन हजार रुपये किंमतीचे अन्नधान्य स्वरुपातील वस्तुचे किट आदिवासी विकास महामंडळ यांच्या मार्फत देण्यात येत आहेत.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमेश काळे, कार्यक्रम संचालन पोंभूर्णा आदिवासी मुलींच्या वसतीगृहाचे गृहपाल सुनीता राणे यांनी तर आभार प्रदर्शन मुलांच्या वस्तीगृहाचे गृहपाल विनोद बिरादार यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोहितकर, निकेश आरेकर, आशिष झाडे, लवाजी बगडे, विश्रांती गोरंतवार यांनी अथक परिश्रम घेतले.