जाहिरात... Advertisement... विज्ञापन

रोहयो समितीच्या दौऱ्यात पोंभूर्णा तालुक्यातील विकास कामाची पाहणी. #Pombhurna #Sonapur #bordaborkar


भर पावसात समीतीने नविन गंगापूरच्या तलावाला दिली भेट.

तलावाच्या पाळीवर फुलवलेल्या वृक्षाच्या बागेची केली स्तुती.
(आधार न्यूज नेटवर्क पोंभुर्णा विशेष प्रतिनिधी) किशोर माहोरकर
पोंभूर्णा:- महाराष्ट्र विधिमंडळ रोजगार हमी योजना समितीने दिनांक ३ सप्टेंबरला पोंभूर्णा तालुक्यातील दोन गावांना भेट देत रोजगार हमी योजने अंतर्गत झालेल्या कामांची पाहणी केली #Pombhurna #Sonapur #bordaborkar
पोंभुर्णा तालुक्यातील आष्टा ग्रामपंचायतीतील सोनापूर, बोर्डा बोरकर ग्रामपंचायतीत नविन गंगापूर या गावांना समीतीने भेट दिली.या भेटीदरम्यान रोजगार हमी योजना समितीच्या सदस्यांनी सोनापूर येथील मामा तलावाच्या पाळीवर फुलवलेल्या विविध जातीच्या वृक्षाच्या बागेतील ४०० वृक्ष जगविल्याबद्दल स्तुती केली. कामाचे अंदाजपत्रक, आजपर्यंत झालेला खर्च, शिल्लक असलेली रक्कम, मजूरांची संख्या, त्यांना मिळत असलेली रोजी, जाॅब कार्ड, मजुरांना मिळत असलेल्या सुविधा, याबाबत समितीने संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली.यावेळी काम करणाऱ्या दोन महिला मजुरांसोबतही समीतीने चर्चा करीत कामाचे स्वरूप जाणून घेतले. #Adharnewsnetwork
बोर्डा बोरकर ग्रामपंचायतीतील नविन गंगापूरच्या मामा तलावाचे खोलीकरण व गाळ काढण्याचे काम रोजगार हमी योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या कामाला भर पावसात समितीने भेट देत कामाच्या बाबतीत समाधानी व्यक्त केली.
तालुक्यात दाखल झालेल्या समितीमध्ये समितीप्रमुख आमदार सर्वश्री मनोहर चंद्रीकापुरे यांच्यासह राजेश पाटील, नरेंद्र दराडे, अमोल मिटकरी, दादाराव केचे, रामदास आंबटकर, विक्रमसिंह सावंत, शिरीष चौधरी, समीर कुणावार, दिलीप बोरसे, राजेश राठोड आदींचा समावेश आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत