बेपत्ता असलेल्या युवकाचा मिळाला मृतदेह. #Death

Bhairav Diwase

शोध पथकाला यश.
(आधार न्यूज नेटवर्क पोंभुर्णा विशेष प्रतिनिधी) किशोर माहोरकर
पोंभुर्णा:- देवाडा बुद्रुक येथील शैलेश अशोक निमसरकार हा तरुण काल दुपारी तीन वाजता पासून बेपत्ता होता. त्याच्या चपला व हतो हातात घेतलेली काठी ही नदी पात्रात आढळून आल्यामुळे त्याचा मृत्यू बुडवून झाला असावा हा अंदाज बांधून आज सकाळपासूनच जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकाला पाचारण करण्यात आले होते. शोध मोहीम राबविण्यात आली. #Death
दरम्यान चार वाजता चे सुमारास वैनगंगा नदीच्या पात्रात सदर युवकाचा मृतदेह आढळून आला. त्याने आत्महत्या केली की आंघोळी दरम्यान त्याचा मृत्यू झाला हे मात्र गुलदस्त्यात आहे. मागील वर्षीच त्याचा आंतरजातीय प्रेमविवाह झाला होता. त्याच्या मृत्यूमुळे निमसरकार परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या मागे पत्नी, आई - वडील व भाऊ असा आप्तपरिवार आहे. #Adharnewsnetwork