आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती.
मुंबई:- राज्यात आरोग्य विभागाच्या ‘गट क’ व ‘गट ड’ पदासाठी होणाऱ्या शनिवार व रविवारच्या परिक्षा तूर्तास रद्द करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.#Adharnewsnetwork
आरोग्य विभागाच्या या परिक्षे संदर्भात बराच गोंधळ निर्माण झाला होता. परिक्षार्थीच्या प्रवेशपत्रावर अनेक चूका असल्यामुळे परीक्षार्थी गोंधळात होते. ऐन वेळी उद्या व परवाला होणाऱ्या परीक्षा रद्द झाल्याने परीक्षार्थींना आर्थिक व मानसिक मनस्ताप सहन करावा लागला आहे. यामुळे आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.
अनेक परीक्षार्थींना मेसेज किंवा ईमेल यावर परिक्षेसंदर्भात कसलाही मेसेज आला नाही. तर प्रवेशपत्र मिळालेल्या परिक्षार्थीच्या प्रवेशपत्रावर चुकीचा मजकूर आढळून आला आहे. यामुळे आरोग्य विभागाच्या परीक्षा तूर्तास रद्द करण्यात आल्या असून परीक्षा होतील पण कधी होतील याची माहिती अजूनपर्यंत देण्यात आली नाही. हा गोंधळ सावरल्यावर लवकरच सदर परीक्षेच्या नव्याने तारखा जाहीर करण्यात येतील अशी माहिती आहे.#Examcancel