नक्षल्यांनी हत्या केली नसून ती अफवा. #Gadchiroli

Bhairav Diwase

धानोरा:- तालुक्यातील मुरूमगाव पोलिस मदत केंद्राअंतर्गत येत असलेल्या केहकावाही येथील युवकाची नक्षल्यांनी हत्या केल्याचे वृत्त अनेक पोर्टल, प्रसार माध्यम, वृत्तांनी प्रसारित केले . मात्र सदर वृत्त हे अफवा असल्याचे प्रत्यक्ष भेटीत कळल्याचे दैनिक चंद्रपूर समाचार प्रतिनिधींनी सांगितले. #Gadchiroli


केहकावाही येथील बिरसुराम तुलावी युवकाला रात्री घरातून उठवून नेले व शनिवारला सकाळी त्याचे मृतदेह गावजवळ कुऱ्हाडीने वार करून टाकल्याचे सांगण्यात आले. घटनेची माहिती मिळताच दैनिक चंद्रपूर समाचार प्रतिनिधी अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भागात वसलेल्या केहकावाही गावाला डोंगरदऱ्यातून पायी प्रवास करून दुपारी प्रत्यक्ष गावाला भेट दिली असता असे काही घडले नसल्याचे स्पष्ट झाले. याबाबत पोलिस विभागासी संपर्क व प्रत्यक्ष भेट घेतली असता सदर युवकाला नक्षल्यांनी घेऊन गेल्याचे सांगितले. मात्र त्यांची हत्या झाली की नाही हे सांगण्यास त्यांनी नकार दिला.
चार महिन्यांपूर्वीच गावात आलो:- बिरसुराम तुलावी.

दैनिक चंद्रपूर समाचार प्रतिनिधींने प्रत्यक्ष सदर युवकाची आज भेट घेऊन माहिती जाणली असता बिरसुराम तुलावी म्हणाले, मला नक्षल निशान्यावरच ठेवण्यात आले आहे. मी सन २०१७ पासून गडचिरोली येथे राहत होतो. परंतु मला माझा प्रपंच सांभाळणे होत नसल्या कारणाने मी चार महिन्यापासून केहकावाही येथे येऊन मोलमजुरी करीत आहे.