श्री. कोंडय्या महाराज संस्थान तर्फे मोफत नेत्रतपासणी तथा मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर. #Gondpipari

Bhairav Diwase

गोंडपिपरी:- माजी अर्थमंत्री, आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या सहकार्याने श्री. संत परमहंस कोंडय्या महाराज संस्थान धाबा व जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर यांच्या सयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी तथा मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. श्री संत परमहंस कोंडय्या महाराज देवस्थान संस्थान परिसरात हे शिबीर दिनांक 29 सप्टेंबरला होणार आहे.
या शिबीरास डॉ. के. एस. लांजेवार, डॉ. एस.जी. बुर्हाण, डॉ. एम. एस. पेंदाम, डॉ. पवन गणपुरे यांची उपस्थिती असणार आहे. परिसरातील गरजू रुग्णांनी या शिबीराचा लाभ घेण्याचे आव्हान संस्थानचे अध्यक्ष अमरभाऊ बोडलावार, सचिव किशोर अगस्ती यांनी केले आहे.