गो. ग. पा. च्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी जनतेची अविरत सेवा करावी:- गजानन जुमनाके. #Warora

Bhairav Diwase
गोंडवाना गणतंत्र पार्टीची वरोरा तालुका कार्यकरणी गठीत.
वरोरा :- गोंडवाना गणतंत्र पार्टी हा पक्ष समाजाच्या अंतिम घटकाचा विकास करण्यासाठी कट्टीबद्ध असून, समाजातील प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी जनतेची अविरत सेवा करावी असे प्रतिपादन गोंडवाना गणतंत्र पार्टी युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष गजानन जुमनाके यांनी केले. ते वरोरा येथे गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.
यावेळी मंचावर गोंडवाना गणतंत्र पार्टीचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष बापूरावजी मडावी, प्रदेश महासचिव अब्दुल जमीर भाई, गोंडवाना गणतंत्र पार्टी जिवती तालुकाध्यक्ष ममताजी जाधव, सामाजिक कार्यकर्ते कुंडलिक मेश्राम, गो. ग. पा. किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेश महासचिव विजयसिंह मडावी, चंद्रपूर गोटूल समितीचे अध्यक्ष सोमाजी कातलाम, गो. ग. पा. महाराष्ट्र प्रदेश संघटक नामदेव शेडमाके उपस्थित होते.
या कार्यक्रमात गोंडवाना गणतंत्र पार्टीची वरोरा तालुका कार्यकरणी गठीत करण्यात आली. त्यात तालुकाध्य म्हणून पत्रूजी आत्राम, उपाध्यक्ष म्हणून प्रमोद मडावी, कार्याध्यक्ष चंद्रशेखर परचाके, सचिव संतोष सोयाम, प्रसिद्धी प्रमुख निखिल कुळमेथे, वरोरा शहराध्यक्ष सुधीर कोवे, गोंडवाना गणतंत्र पार्टी महिला मोर्चा तालुकाध्यक्ष म्हणून पुष्पाताई मंगाम, उपाध्यक्ष अनुश्रीताई येरमे, कार्याध्यक्ष मंदाताई मरस्कोल्हे, सचिव छायाताई उईके, वनिताताई परचाके वरोरा शहराध्यक्ष गोंडवाना गणतंत्र पार्टी महिला मोर्चा
कार्यक्रम यशस्वीतेसाठी भास्कर तुमराम आणि गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.