IPL सट्टेबाजांवर चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेची धाड. #IPL #Chandrapur

Bhairav Diwase
(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
चंद्रपूर:- गडचिरोली जिल्हा पोलिस प्रशासनाने काही दिवसांपूर्वी IPL क्रिकेटवर सट्टा लावणाऱ्या रॅकेटचा भांडाफोड केला, त्यामध्ये अनेक आरोपी हे चंद्रपूर जिल्ह्यातील होते.
गडचिरोली नंतर चंद्रपूर जिल्हा पोलिस प्रशासन सुद्धा IPL वर सट्टा लावणाऱ्यावर कारवाई करण्यास सज्ज झाली आहे. दुबई येथे सुरू असलेल्या IPL क्रिकेट सिरीज मध्ये चेन्नई सुपर किंग्ज व कोलकाता नाईट रायडर या दोन चमू मध्ये मॅच सुरू असताना शेगाव येथे सदर लाईव्ह मॅच मध्ये नविश देवराव नरड हे लोकांकडून पैसे घेत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली असता, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी पथक तयार करीत शेगाव येथे छापा टाकला.
सदर स्थळी 4 इसम हे लाइव्ह मॅचवर सट्टा लावताना रंगेहात मिळाले, आरोपीकडून नगदी रक्कम, मोबाईल व टिव्ही असा एकूण 74 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर सट्टेबाजांवर महाराष्ट्र जुगार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणी 4 आरोपीना अटक करण्यात आली असून त्यामध्ये नविश देवराव नरड शेगाव, सूरज शंकर बावणे शेगाव, नितीन तात्याजी उईके वरोरा, हरिदास कृष्णा रामटेके चिमूर यांचा समावेश आहे.
IPL मॅच च्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी कोट्यवधी रुपयांचा जुगार खेळला जातो, या ऑनलाइन गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या आदेश देत या सट्टेबाजांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले, मात्र या सट्ट्याच्या दुनियेत अजूनही मोठे मासे यावर अधिराज्य गाजवीत आहे, मात्र ते पोलिसांच्या कारवाईपासून दूर आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे, अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वात सपोनि जितेंद्र बोबडे, पोउपनी संदीप कापडे, धनराज करकाडे, स्वामी चालेकर, संदीप मुळे, अमोल धांदरे, प्रशांत नागोसे यांनी यशस्वीपणे पार पाडली.