🙏🙏 ✍️🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

दुर्गापूर पोलिसांची अवैध कोंबडा बाजारावर धाड. #Arrested #Cockbazar

5 आरोपींना अटक; 1 लाख 99 हजारांचा मुद्देमाल जप्त.

(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
चंद्रपुर:- दुर्गापूर पोलीस स्टेशन हद्दीतील वरवट शेतशिवारात कोंबडा बाजार सुरू असल्याची माहिती दुर्गापूर पोलिसांना मिळाली असता त्यांनी पोलीस चमू सह धाड टाकत 5 आरोपीना अटक करीत 1 लाख 99 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

मागील वर्षी जिल्ह्यात अवैध कोंबडा बाजाराने धुमाकूळ घातला होता, मात्र काही बहाद्दरांनी दुर्गापूर येथील वरवट शेत शिवारात गुपचूप अवैध कोंबडा बाजार सुरू केला. म्हणतात न "पोलीस के हाथ लंबे होते है" या म्हणीसारखे पोलिसांनी कायद्याचा धसका दाखवीत कारवाई केली.

कोंबडा बाजार खेळणारे आरोपी 30 वर्षीय नंददीप विजय लोखंडे, 26 वर्षीय महादेव गुलाब कासवटे दोन्ही रा. येरूर ताडाळी, 42 वर्षीय राजकुमार दामोदर खारकर रा.खैरगाव चंद्रपूर, 30 वर्षीय रवी सुरेश निंदेकर रा. बालाजी वार्ड चंद्रपूर व 19 वर्षीय नाजीम छोटू शेख रा. दुर्गापूर याला अटक करण्यात आली. 35 वर्षीय अभिमान रायपुरे वरवट हा फरार आहे.

आरोपीकडून नगदी 11 हजार 700 रुपये, 5 नग कोंबडे 1 हजार 500 रु., 4 लोखंडी कात्या कि.400/रु, 3 नग मोबाईल कि.15,500/रु., 3 मोटर सायकली कि 1,70,000 /रु. असा एकुण 1 लाख 99 हजार 100 /रु.चा माल जप्त करण्यात आला आहे.

सर्व आरोपीवर महाराष्ट्र जुगार कायद्यांव्ये कारवाई करण्यात आली आहे. सदरची कारवाई दुर्गापूर पोलीस निरीक्षक स्वप्नील धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनी प्रविण सोनोने, पोहवा सुनिल गौरकार, पोहवा.अशोक मंजुळकर, नापोशी.जयसिंग जाधव, पोशि. मनोहर जाधव, पोशि.मंगेश शेंडे पो.स्टे. दुर्गापूर यांनी केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत