Top News

युवकाने केला युवतीवर चाकु हल्ला. #Knifeattack


आरोपी अटकेत, युवती गंभीर.
(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- शहरातील महाकाली मंदिर परिसरात 9 सप्टेंबर ला सायंकाळी 8 वाजताच्या सुमारास एका मुलाने आपल्या प्रेयसीवर चाकूने वार केले, हा सर्व प्रकार एका बार समोर घडला. #Knifeattack
सायंकाळी तरुण व तरुणींमध्ये बार समोर कडाक्याचे भांडण सुरू होते, अचानक 25 वर्षीय युवकाने त्या युवती वर चाकूने सपासप वार केले.
त्या मुलीच्या पोटावर, छातीवर व हातावर असे तब्बल 4 ते 5 वार करून मुलीला जखमी केले.
सदर माहिती शहर पोलिसांना मिळाल्यावर त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपी बाबूपेठ निवासी प्रफुल मेश्राम ला अटक केली.
युवतीची प्रकृती गंभीर असल्याने तिच्यावर सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार हे युवक- युवती यांचं आपसात प्रेम प्रकरण सुरू होते मात्र प्रेमात धोका मिळाल्याने हा प्रकार घडला असल्याची माहिती मिळाली. दोघेही युवक व युवती बाबूपेठ परिसरातील रहिवासी आहे. सध्या शहर पोलिसांनी कलम 307 अनव्ये आरोपी मेश्राम वर गुन्हा दाखल केला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने