पोलिसांची घरावर धाड. #Korpana #arrested

Bhairav Diwase
जुगार खेळत असताना 7 लोकांना अटक.
कोरपना:- नांदा फाटा पोलीस चौकीतील पोलिसांनी येथील दूध डेरी, अवाळपुर येथे राजकुमार पुरके यांचे राहते घरात काही इसम जुगार खेळ खेळत आहेत अशा माहीतीचे आधारे पोलीस निरीक्षक सत्यजित आमले यांचे मार्गदर्शनात मेजर बुरहाण, सुनील मेश्राम, संदिप अडकिने आणि निखिल बोंडे यांनी दूध डेरी, अवाळपूर् येथे राजकुमार पूरके यांचे राहते घरी जावुन धाड टाकली असता एकुन 7 जुगार खेळणारे इसम सापळले. #Korpana #arrested
नांदा फाटा पोलीसांनी जुगार खेळण्याच्या इसमाकडुन 1070 रु. नगदी मुददेमाल जप्त केला असुन एकुण 7 आरोपी विरुध्द 12/अ म. जु. का. अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.