Top News

विजेच्या समस्येसंदर्भात कोडशी खुर्द येथील नागरिकांचा वीज वितरण कार्यालयावर धडक. #Korpana

वीज पुरवठा नियमितपणे सुरू ठेवण्याची मागणी.
(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
कोरपना:- कोरपना तालुक्यातील कोडशी खुर्द येथील वीज पुरवठा मागील २-३ महिन्यांपासून वारंवार खंडित होत होता त्यामुळे गावातील नागरिकांना नाहक मानसिक त्रास सहन करावा लागत होता त्यामुळे गावातील नागरिकांनी भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांच्या नेतृत्वात कोरपना येथील वीज वितरण कंपनी वर विजेच्या संदर्भातील तोडगा काढण्यासाठी धडक दिली.

💥मुलगी भाव देत नाही; खचलेल्या तरूणाचे थेट आमदारानांच पत्र.

कोरपना तालुक्यातील कोडशी खुर्द हे गाव तालुक्यातील शेवटच्या टोकावर पैनगंगा नदीच्या काठावर वसलेले गाव आहे. या गावात ९०% नागरिक हे शेतकरी व्यवसाय करतात पंरतु दिवसभर काम करून आल्यानंतर रोज सायंकाळी वीज पुरवठा खंडित होत असतो हा प्रकार मागील २-३ महिन्यांपासून सुरू आहे.त्यामुळे गावातील सरपंच यांच्यासह गावातील नागरिकांनी लाईनमेन यांच्या लक्षात आणून दिली,परंतु त्यांनी त्यांनी गावकऱ्यांच्या समस्येकडे वारंवार दुर्लक्ष केले,त्यामुळे गावातील वीज पुरवठा खंडित होण्याची समस्या तशीच राहली. #Korpana
        
        सदर प्रकरण गावातील नागरिकांनी भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांच्या लक्षात आणून दिली,त्यांनी सदर प्रकरणाची दखल घेत कोरपना येथील वीज वितरण कार्यालयावर गावातील नागरिकांसह धडक दिली.त्यांनी सदर प्रकरण उपविभागीय अभियंता इंदूरकर व कनिष्ठ अभियंता होकम यांच्या लक्षात आणून दिले.व यावर तात्काळ दीर्घकालीन उपाययोजना करण्याची मागणी केली.
      यावर आपण कोडशी खुर्द येथील ग्रामपंचायत कार्यलयात बैठक आयोजित करून विजेच्या समस्यांवर तोडगा काढू असे अश्वासन कनिष्ठ अभियंता होकम यांनी दिले.
      यावेळी सत्यवान चामाटे, अजय तिखट,गजानन दूरटकर, सतीश बोर्डे, गुलाब मेश्राम, पत्रकार रवी मडावी, मंगेश बोर्डे, विनोद मेश्राम, मारोती जुमनाके, विशाल गेडाम, अनिल जरीले, रंजित पिदूरकर, वासुदेव बोर्डे, संदीप बानकर, सुरज जगनाडे, प्रज्योत बानकर, गंगाराम जुमनाके,अमोल बोर्डे व गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने