कोलगाव ऊपसरपंच श्री.पुरुषोत्तमजी लांडे यांची प्रमुख ऊपस्थिती.
(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- गेल्या कित्येक वर्षांपासून होऊ घातलेला सास्ती कोलगाव ug to oc प्रकल्प कॉस्टप्लस मध्ये गेल्याने बरेच वर्षांपासून प्रलंबित असल्याने परिसरातील सास्ती,कोलगाव,धोपटाला,मनोली काढोली या सर्व गावातील प्रकल्पग्रस्त शेतकरी हवालदिल झालेले आहेत. त्या सर्व लोकांच्या आशा या निराशेमध्ये परिवर्तित व्हायला लागल्या परंतु प्रकल्पाचे काम मात्र पुढे पुढे ढकलल्या जात आहे.#Adharnewsnetwork
दिनांक 12/09/2021 ला कृषी व पशुसंवर्धन सभापती श्री.सुनीलभाऊ उरकुडे यांचे सह पुरुषोत्तम लांडे उपसरपंच कोलगाव यांनी काही प्रकल्पग्रस्त शेतकर्यांंना घेऊन माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज भैय्या अहिर यांचे निवासस्थानी त्यांची भेट घेतली व आजची प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची आर्थिक व मानसिक परिस्थिती त्यांचे समोर मांडली. प्रकल्प लवकरात लवकर सुरू करणे बाबत अनेक बाजूंनी चर्चा झाली त्यानंतर आता ज्या कारणामुळे प्रकल्प लांबणीवर चालला होता ते म्हणजे तिसऱ्या ग्राहकाचे एग्रीमेंट ,त्यात माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री यांनी तिसऱ्या ग्राहकाच्या रुपात एन, टी, पी,सी ची वाटचाल सुरू आहे आणि येत्या एक आठवडाभऱ्यात वेकोली मुख्यालय नागपूर येथे होऊ घातलेल्या बैठकीत या विषयावर चर्चा होऊन प्रकल्पाला गती मिळेल असे प्रतिपादन केले.तेव्हा उपस्थित प्रकल्प ग्रस्त शेतकरींनी समाधानपूर्वक आभार मानून प्रकल्पासाठी प्रयत्नात सातत्य ठेवावे अशी मागणी केली.
त्याप्रसंगी श्री. रघुवीर अहिर भा.ज.यु.मो. प्रदेश उपाध्यक्ष ,श्री.विजय वानखेडे दलित आघाडी जिल्हा अध्यक्ष, श्री.राजू दिवसे, श्री.बालाजी पिंपळकर, श्री.किशोर कुडे,श्री.निखिल जिझलवर,जय काकडे, श्री.शत्रूघन पेटकर,श्री.राजेश उरकुडे आदींची उपस्थिती होती व या समाधानामुळे ऊपस्थित कोलगांववासीयांनी सुनिलभाऊचे आभार मानले.#Meeting