जाहिरात... Advertisement... विज्ञापन

रेल्वे सबवे मधील साचलेले पाणी त्वरीत काढा:- जि.प.सदस्य संजय गजपुरे. #Nagbhid


कायमस्वरुपी तोडगा काढण्याची शेतकरी व नागरिकांची मागणी.
(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
नागभीड:- चांदाफोर्ट व गोंदिया रेल्वे लाईनवर आतापर्यंत अनेक ग्रामीण मार्गांवर जा ये करण्यासाठी अनमॅन्ड क्रॅासिंग ची व्यवस्था होती. पण यावर ठिकठिकाणी होणारे अपघात लक्षात घेता रेल्वे विभागाने रेल्वे लाईनचे खालुन सबवे चे बांधकाम केलेले आहे व वरुन जाणारे रस्ते कायमचे बंद केले आहेत. पण या ठिकाणी साचलेल्या पाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने हे सबवे आता शेतकऱ्यांना व नागरिकांना त्रासदायक ठरत आहेत. #Nagbhid

    रेल्वे लाईनवर होणारे अपघात टाळण्यासाठी व निर्धोकपणे वाहतुकीची व्यवस्था व्हावी या चांगल्या अपेक्षेने या सबवे चे बांधकाम करण्यात आले आहेत. पण अनेक ठिकाणी चुकीच्या पद्धतीने सदर सबवे बांधण्यात आल्याने पावसाळ्यात या ठिकाणी पाणी साठुन राहते. पाण्याच्या निचरा होण्याची व्यवस्था अपुरी व चुकीची असल्याने अनेक दिवस पाणी निघत नाही व यामुळे यामार्गे होणारी वाहतुक बंद होते. याचा सर्वाधिक फटका रेल्वे लाईन च्या पलीकडे शेती असलेल्यांना बसत आहे. #Adharnewsnetwork
         
        नागभीड तालुक्यातील गंगासागर हेटी ते ब्रम्हपुरी तालुक्यातील किटाडी या ग्रामीण मार्गावर बांधण्यात आलेल्या GCF - 93 या क्रमांकाच्या सबवे मध्ये मागील अनेक दिवसांपासून पाणी साचून असुनही पाणी काढण्याची व्यवस्था तोकडी पडत असल्याची माहिती भाजपाचे युवा नेते कैलास अमृतकर यांनी या विभागाचे जि.प.सदस्य व दक्षिण पुर्व मध्य रेल्वे  बिलासपुर झोनचे सदस्य संजय गजपुरे यांना दिली. त्यांनी तातडीने रेल्वे विभागाशी संपर्क साधून दपुम रेल्वेचे सहाय्यक मंडल अभियंता एस.डब्ल्यु.गाले व अनुभाग अभियंता मुकेश मिश्रा यांच्यासह घटनास्थळी भेट दिली व परिस्थिती अवगत करुन घेतली.
                                                           यावेळी गंगासागर हेटी चे सरपंच दिलीप गायकवाड , कैलास अमृतकर, पत्रकार महेश काशीवार व भारत चुनारकर यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांची उपस्थिती होती.ऐन शेतीच्या हंगामात शेतीवर जाण्याचा मार्ग बंद झाल्याने कुठलेही वाहन अथवा यंत्रे नेता येत नसल्याने शेतकामे कशी करावी असा प्रश्न यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना केला. अनेक शेतकऱ्यांनी रेल्वे प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करीत लवकरात लवकर सबवे मधील पाणी काढुन मार्ग मोकळा न केल्यास रेल्वे लाईनवरील जुनाच मार्ग पुर्ववत सुरु करणार असल्याची माहिती देत याची संपूर्ण जबाबदारी रेल्वे प्रशासनाची राहील असे स्पष्ट केले.
                                                           याप्रसंगी संजय गजपुरे यांनी सबवेतील पाणी काढण्यासाठी त्वरीत डिझेल इंजिन ची व्यवस्था करण्याची सुचना केली व दरवर्षीच अशी परिस्थिती उद्भवत असल्याने यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी संबंधीत अभियंत्यांना निर्देश दिले. घनदाट जंगलात हा सबवे असल्याने वाघ , बिबट व वन्यप्राण्यांचाही वावर या परिसरात असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. यावेळी जि.प.सदस्य संजय गजपुरे व सरपंच दिलिप गायकवाड यांच्या उपस्थितीत  सहाय्यक मंडल अभियंता एस.डब्ल्यु. गाले यांना भाजपाचे युवा नेते कैलास अमृतकर यांच्या नेतृत्वाखाली गावकरी व शेतकऱ्यांनी निवेदन दिले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत