जाहिरात... Advertisement... विज्ञापन

मोहाळी येथे मोतिबिन्दु डोळे तपासणी शिबिर संपन्न. #Program(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) विरेंद्र मेश्राम, सिंदेवाही
सिंदेवाही:- मोहाळी(नलेश्वर) गावामध्ये
कोरोना काळातही श्री. रमाकांत लोधे जि. प. सदस्य चंद्रपुर यांची मोतीबिंदू चळवळीची परंपरा कायम असून मागील १५ वर्ष्यापासून सातत्याने मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करीत तालुक्यातील मोतीबिंदू उच्चाटनाची लोकचळवळ हाती घेणारे श्री.रमाकांत लोधे हे शिबीर घेत आहेत.परंतु या कोरोना काळात तालुक्यात मोतिबिंदू रुग्णांची संख्या मोठ्या वाढली म्हणून जि.प.सदस्य श्री.रमाकांत लोधे यांनी लायन्स क्लब,चंद्रपूर आणि सेवाग्राम नेत्र रुग्णालयाचे नेत्रतज्ञ व प्रशासनाशी गावस्तरावर शिबीराचे आयोजन करण्यासंदर्भात चर्चा केली, सर्व शासन नियम पाळून शिबिर आयोजनाला परवानगी मिळवून आज दि.28/08/21 ला मौजा मोहाळी येथे शिबीर घेऊन 125 रुग्णांची तपासणी करुण 37 जनाची शस्त्रक्रियनिवड करण्यात आली.#Adharnewsnetwork
सेवाग्राम वैद्यकीय महाविद्यालय, सेवाग्राम ,लायन्स क्लब चंद्रपूर आणि जि. प.सदस्य श्री.रमाकांत लोधे यांच्या संयुक्त विद्यमाने शिबिराचे आयोजन करण्यात आले. मोहाळी येथील वैद्यकीय अधीकारी डॉ:कावले सर्,लायन्स क्लब चंद्रपुर येथील डॉ:जोशी सर्, दिनेश बजाज सर् ,श्री.चांडक साहेबहे उपस्तित होते. तसेच ग्रामीण रुग्णालय,सिंदेवाही येथील सहाय्यक श्री. दुधे साहेब (नेत्र चिकित्सक )यांनी रुग्णांची नेत्र तपासणी केली आणि निवडलेल्या 37रुग्णांना शस्त्रक्रियेकरीता सेवाग्राम नेत्र रुग्णालय सेवाग्राम येथे रवानगी करण्यात येणार आहे.
कोरोना काळात असंख्य  मोतीबिंदू रुग्ण दृष्टीजाण्याच्या भीतीने त्रस्त झाले होते अशा संक्रमन काळात गावस्तरीय शिबीरांचे आयोजन करून जिल्ह्याभरात मोतीबिंदू आणि रक्तदान चळवळीसाठी नावलौकिक असणारे जि.प.सदस्य श्री. रमाकांत लोधे यांनी नक्कीच त्या वृद्ध मोतीबिंदू रुग्णांना नवदृष्टीची संजीवनी दिली आहे.
  सदर शिबिराच्या आयोजन आणि यशस्वीतेकरिता जि.प सदस्य श्री. रमाकांत लोधे यांच्या सोबतीने ,श्री. कपिल मेश्राम सामाजिक कार्यकर्ते रत्नापुर, टिकाराम कुंभरे, आशिष पात्रे, आशिष नागोसे, माणिक गेडाम तशेच मोहाळी येथील सामाजिक कार्यकर्ते यांनी विशेष मेहनत घेतली
    अशी गावस्तरावरील शिबिरे पूर्ण तालुकाभर आयोजित करून मोतीबिंदू उच्चाटनाची चळवळ कायम राबविल्या जाहील असा मानस श्री. रमाकांत लोधे यांनी व्यक्त केला आहे.#Program

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत