पोंभुर्णा-मुल-चंंद्रपुर मार्गावरील नवनिर्मित पुलाला पडले भगदाड! #Pombhurna

Bhairav Diwase
(आधार न्यूज नेटवर्क पोंभुर्णा विशेष प्रतिनिधी) किशोर माहोरकर
पोंभुर्णा:- पोंभुर्णा येथील विद्युत कार्यालयाजवळ असलेल्या नाल्यावर यंदा पुलाचे बांधकाम करण्यात आले. पण, पुलाच्या दोन्ही बाजूला माती व मुरमाचा भरणा योग्यरितीने केला गेला नाही. त्यामुळे पावसाने दोन्ही बाजूचा भाग खचला आहे. आणि मार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून, पोंभूर्णा-मूल-चंद्रपूर मार्ग बंद झाले आहे.

दरम्यान, गुरूवारी सायंकाळच्या सुमारास या मार्गावरून मार्गक्रमण करणारा ट्रक फसला. आता या मार्गावरून दुचाकीनेही प्रवास करणे अडचणीचे झाले आहे. दुचाकीधारकास दुचाकीला धक्का मारत प्रवास करावा लागत आहे. यापूर्वी जुलै महिन्यातही असाच प्रकार घडला.

या पुलाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे केला असल्याचा आरोप आता या परिसरातील नागरिकांकडून केला जात आहे. संबंधित कंत्राटदारावर कार्यवाहीची मागणी नागरिकांनी रेटून धरली आहे. दरम्यान, बांधकाम विभागाचे अधिकारी राजेश चव्हाण यांनी योग्य ती चौकशी करून कंत्राटदारावर कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले आहे.