पोंभूर्ण्यात सेवा सप्ताह कार्याक्रमात ७१ ज्येष्ठांचा सत्कार. #Pombhurna

Bhairav Diwase
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ७१ वा वाढदिवस साजरा.
(आधार न्यूज नेटवर्क पोंभुर्णा विशेष प्रतिनिधी) किशोर माहोरकर
पोंभूर्णा:- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त पोंभूर्णा भाजपाकडून सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. या सेवा सप्ताहाची सुरुवात १७ सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पोंभूर्णा शहरातील शासकीय योजनांचा लाभ घेणाऱ्या ७१ वृद्धांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करित साजरा करण्यात आला.
यावेळी भाजपा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अल्का आत्राम,माजी नगरसेवक अजीत मंगळगिरीवार, विनोद देशमुख,नंदकिशोर तुम्मुलवार ,रुषी कोटरंगे ,दिलीप मॕकलवार ,हरि ढवस ,ओमदास पाल ,अजय म्हस्के ,विनोद कानमपल्लीवार , आदित्य तुम्मुलवार,गजानन मडपुवार, बबन गोरंतवार ,चरणदास गुरनुले ,ज्योती बुरांडे,सुनिता मॕकलवार ,वर्षा मोहुर्ले,श्वेता वनकर ,रजीया कुरेशी,आशा गुडेपवार ,ऊषाराणी वनकर आदी भाजपा पदाधिकारी तथा कार्यकर्त मोठ्या संख्येने ऊपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपले संपूर्ण जीवन देशाची सेवा आणि गरिबांच्या उन्नती व विकासासाठी काम करण्यासाठी समर्पित केले आहे. १७ सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवसानिमित्त पोंभूर्णा तालुका भाजपाकडून १७ ते २३ सप्टेंबरपर्यंत सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सप्ताहाची सुरूवात पोंभूर्णा येथील श्री राजराजेश्वर देवस्थान सभागृहातून करण्यात आले. यावेळी शहरातील शासकीय योजनांचा लाभ घेणाऱ्या ७१ ज्येष्ठांचा शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. यासोबतच तालुक्यातील गावांमध्ये सेवा सप्ताह साजरा करण्यात येणार आहे.