Top News

पोंभूर्णा तालुक्यात संततधार पाऊस. #Rain #Pombhurna


बोडी, तलाव, नदी, नाले तुडूंब.
(आधार न्यूज नेटवर्क पोंभुर्णा विशेष प्रतिनिधी) किशोर माहोरकर
पोंभूर्णा:- पोंभूर्णा तालुक्यात तीन दिवसापासून पावसाने कहर केला असून सततच्या संततधार पावसामुळे सोयाबीन,कापूस पिकाचे फार मोठे नुकसान झाले आहे. तर नदी ,नाले, बोडी, तलाव तुडुंब भरलेले आहे. #Rain #Pombhurna
काही दिवसापासून दडी मारून बसलेल्या पावसानी पाडव्यापासून तालुक्यात हजेरी लावली आहे. संततधार पावसामुळे नदी नाले तुडुंब भरलेले असून . धान पिकासाठी उपयुक्त असलेला पाऊस अनेक पिकासाठी मात्र याचा मोठा फटका बसला आहे.यात प्रामुख्याने फुलावर आलेली सोयाबिन, कापूस,मिर्ची याचे फार मोठे नुकसान झाले आहे.यामुळे सोयाबिन व कापूस पिकवणाऱ्या शेतकऱ्याची चिंता वाढलेली आहे.
संततधार पावसामुळे बैल पोळा व तान्ह्या पोळ्याच्या सणावरही विरजन पडले आहे. बैल पोळ्याच्या दिवशी संध्याकाळी व रात्री पोंभूर्णा शहर व तालुक्यात जोरदार पाऊस पडला होता . आज तान्हा पोळ्याला सकाळी शांत झालेला पाऊस दुपारपासून मुसळधार बरसत आहे.तान्ह्या मुलांच्या आनंदाचा सण असलेला तान्हा पोळा साजरा करू शकत नसल्यामुळे चिमुकल्यांचा हिरमोड झाला आहे. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नदी, नाले, बोडी, तलाव तुडुंब भरून वाहत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने