Click Here...👇👇👇

धनराज दुर्योधन यांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव. #Award

Bhairav Diwase


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- जेसीआय राजुरा राॅयल्सच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कार यावर्षी जि.प.उ.प्रा.शाळा भुरकुंडा (बु.) येथील विज्ञान विषय शिक्षक धनराज दुर्योधन यांना जाहीर झाला आहे.
शिक्षकदिनी बल्लारपूर येथे पीडब्लुडी सभागृहात धनराज दुर्योधन यांना शाल,सन्मानचिन्ह व सन्मानपत्र जेसीजचे पदाधिकारी नरेंद्र बर्डिया व भरत बजाज यांच्या शुभ हस्ते देऊन गौरविण्यात आले.यावेळी सुषमा शुक्ला,स्मृती व्यवहारे,जयश्री शेंडे,सुशिला पुरेड्डीवार आदी मान्यवर उपस्थित होते.#Adharnewsnetwork


विज्ञानवादी दृष्टीकोन जोपासणारे धनराज  रघुनाथ दुर्योधन यांनी राबविलेले विविध उपक्रम शिक्षण क्षेत्रासाठी अमुल्य आहे.अध्यापनाच्या कार्यासोबत पर्यावरण संरक्षणासाठी विविध उपक्रम,मतदार जनजागृती अभियान,लेक वाचवा लेक शिकवा अभियान इत्यादी अनेक उपक्रम राबविले.तालुकास्तरावर त्यांचे विद्यार्थी विविध स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केले आहे.त्यांचे विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेतही पात्र ठरले आहे.लाॅकडाऊनच्या काळात धनराज दुर्योधन यांनी आॅनलाइनद्वारे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय निबंध,वक्तृत्व,प्रश्नोत्तरी,लघुकथा लेखन,बोधकथा अशा विविध स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.
तंबाखूमुक्त शाळा केल्याबद्दल राम गारकर शिक्षणाधिकारी यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देवुन गौरविण्यात आले आहे.राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत कर्तुत्ववान शिक्षक पुरस्कार सन्मानपत्र प्राप्त झाले आहे.त्यांना सेवादिप मानवसेवा राष्ट्रीय पुरस्कार,ग्लोबल टिचर रोल माॅडेल अवार्ड,राज्यस्तरीय गुणवंत शिक्षकरत्न पुरस्कार,ग्रीन फाउंडेशन पुरस्कार,,महाराष्ट्र शिवरत्न पुरस्कार असे विविध पुरस्कार प्राप्त झाले आहे. आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल त्यांनी जेसीआय राॅयल्स टिमचे आभार मानले आहे.#Award