युवा स्वाभिमान पक्षामध्ये चुनाळा व बामनवाडा येथील तरूनांचा प्रवेश.#Rajura(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- युवा स्वाभिमान पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्री.सूरज भाऊ ठाकरे यांचा कार्याला प्रेरित होऊन राजुरा विधानसभा क्षेत्रातील विविध पक्षातील बरेच युवक महिला व कामगारांचा पक्षात प्रवेश जोरात सुरू आहे.#Adharnewsnetwork


युवा स्वाभिमान पार्टी चे अल्पसंख्याक अध्यक्ष शोएब शेख व तालुका समन्वयक आशिष यमनुरवार यांचा नेतृत्वात आज दिनांक ८ सप्टेंबर २०२१ ला चुणाळा येतील वार्ड क्रमांक १ व बामनवाडा मधील अयुब अली, अजय आत्राम, गौरव मेश्राम, श्रीकांत आत्राम, शंकर आत्राम, प्रणाल मत्ते व रोशन कोडपे युवा स्वाभिमान पक्ष राजुरा मध्ये प्रवेश करण्यात आला.. त्यावेळी चुणाळा वार्ड क्र.१ मधील बरेच महिला व पुरुष उपस्थित होते, १० वर्षा पासून घरकुल व गॅस सिलेंडर चा समस्यांवर त्यांनी सूरज भाऊ यांच्याशी ऑनलाईन चर्चा केली त्यावेळी त्यांना सूरज भाऊ ठाकरे यांनी सांगितले की येत्या काही दिवसात आपल्या समस्या आम्ही सोडवून देऊ त्यावेळी महिला पुरुषांनी सांगितले की आमचा समस्यांच निवारण झाल्या वर आम्ही सर्व जण आपल्या पक्षात प्रवेश करू.
त्यावेळी राजुरा युवा स्वाभिमान पार्टी चे आल्वीन सावरकर, राहुल चौहान, अमोल ताठे, नावेद शेख, आदित्य भाके, निखिल बजाईत, अमित डांगे, अजावान टाक, मंगेश वडस्कर, पवन चींतल व भूपेश साठोने उपस्थित होते.#Rajura

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत