🙏


🙏✍️

राज्यातील शाळा "या" तारखेपासून सुरू होणार. #School


मुंबई:- कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे गेल्या दीड वर्षांपासून बंद असलेल्या शाळा पुन्हा एकदा सुरू होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार येत्या 4 ऑक्टोबरपासून राज्यातील शाळा सुरू होणार आहेत. शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्याबाबत मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावावर विचार आणि चर्चा करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे. कोरोनाचे सर्व नियम पाळून राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे.
राज्यातील विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी आहे. शाळा सुरु झाल्यानंतर कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यामुळे गेल्या दीड वर्षांपासून राज्यातील शळा बंद आहे. मात्र आता लवकरच शाळेची घटं पुन्हा वाजणार आहे. राज्य सरकारने शाळा आता पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यभरात लॉकडाऊन लागू करण्यात आल्यानंतर सर्व शाळांमध्ये ऑनलाईन शिक्षण सुरू होतं. अखेर सरकारने राज्यातील शाळा सुरू करण्यासाठी परवानगी दिली आली आहे. 4 ऑक्टोबरपासून राज्यातील शाळा सुरू होणार आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. त्यामुळे शाळा कधी सुरू होणार अशी चर्चा गेल्या अनेक दिवासापासून सुरू होती होती. टास्क फोर्सकडून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा देखील इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे शाळा कधी सुरू होणार या प्रतिक्षेत पालक आणि विद्यार्थी होते. मात्र आता राज्य सरकारणे शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून सोशल डिस्टिंसिंगच्या नियमांचं पालन करावे लागणार आहे. यासोबत शाळा सुरु करण्याची नियमावली कशी असणार आहे याकडे विद्यार्थी आणि पालकांचं लक्ष आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत