Top News

प्रकल्पग्रस्तांचे प्रश्नांना गती. #Chandrapur

धोपटाळा प्रकल्पाचा मार्ग लवकरच मोकळा, सीएमडी नी मान्य केले:- हंसराज अहीर.
(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
चंद्रपूर:- एकोणा विस्तारीकरण प्रकल्प, शिवणी प्रकल्प, धोपटाळा प्रकल्प व चिचोली रिकास्ट प्रकल्पाशी संबंधीत समस्या, प्रलंबित प्रश्नांबाबत दि. 23 सप्टेंबर रोजी पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये वेकोलि मुख्यालय नागपूर येथे बैठक पार पडली. या बैठकीमध्ये एकोणा विस्तारीकरण प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांचे नोकरीचे प्रस्ताव तातडीने मार्गी लावण्याचे तसेच शेतकÚयांना शेताचे पंचनामे करून ओलीताचा दर लागु करण्याचे वेकोलि प्रबंधनाने मान्य केले. शिवणी प्रकल्पाला सेक्शन 4 लागु करण्यास नव्याने नोटीफीकेशन लवकरात लवकर करण्याचे बैठकीत मान्य केले. अन्य विषयांबाबतही सकारात्मक निर्णय घेण्यात आले.

या बैठकीस वेकोलिचे अध्यक्ष तथा प्रबंध निदेशक मनोज कुमार, मुख्यालय प्रबंधनचे वरीष्ठ अधिकारी प्रकल्पग्रस्तांचे प्रतिनिधी तारेंद्र बोर्डे, धनंजय पिंपळशेंडे, भाजपा किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजु घरोटे, मधुकर नरड, प्रशांत घरोटे, कोलगावचे सरपंच पुरूषोत्तम लांडे, किशोर कुडे, जय काकडे, प्रफुल देवगडे, शरद चापले, संदीप पोडे यांची उपस्थिती होती.
धोपटाळा प्रकल्पग्रस्तांना धनादेशाचे लवकरच वितरण....

मध्य प्रदेश विज निर्मिती कंपनीव्दारे धोपटाळा प्रकल्पातील कोळसा खरेदीबाबत बोर्ड मिटींग मध्ये निर्णय झाला असुन कोळसा खरेदीच्या करारनाम्यानंतर लगेचच शेतकऱ्यांना धनादेश वाटपाचा मार्ग मोकळा होईल असे अध्यक्ष प्रबंध निदेशकांनी सांगीतले.
चिंचोली प्रकल्प रद्द होणार नाही, न्यायलयाचे आदेशाविना नोकरी व मोबदला थाबवु नये....

चिंचोली रिकास्ट प्रकल्पाची फारसी प्रगती झाली नसल्याबद्दल खंत व्यक्त करून या प्रकल्पाला कोणत्याही परिस्थितीत डीनोटीफाय करण्यात येवू नये अशी सुचना हंसराज अहीर यांनी वेकोलि प्रबंधनास केली. न्यायालयाचे आदेश नसतांना नोकरी व मोबदला थांबविल्या जावू नये असे सुचित केले. लक्ष्मी मुक्ती जि.आर अंतर्गत फेरफार झालेल्या व प्रलंबित असलेल्या नोकऱ्यांच्या प्रकरणात जिल्हाधिकारी यांचे समोर प्रकरण ठेवून त्यांच्या सुचनेनुसार नोकरी विषयक निर्णय घेण्याचे प्रबंधनाने मान्य केले. विवाहीत मुलींना किंवा त्यांच्या वारसांना नोकरी देण्याबाबत लवकरच निर्णय घेवू असे यावेळी सांगीतले. न्यायालयात प्रलंबित असलेल्या जमीनीच्या विवाद प्रकरणात सेक्शन 9 च्या अधिसुचनेनंतर दाखल झालेले व स्टे आॅर्डर किंवा मनाई हुकूम नसलेल्या प्रकरणात नोकऱ्या मोकळ्या करण्याची सुचना अहीर यांनी केली. यावेळी अनावश्यक दाव्यांमध्ये दाव्यांच्या मेरीटनुसार नोकरीबाबत निर्णय घेतला जाईल असे मान्य केले.
मुंगोली, मार्डा अ अन्य गावांचे पुनर्वसन जुन्याच पाॅलीसी नुसार......

आयएमई आणि अॅपेक्स मेडीकल बोर्ड मध्ये अपात्रा प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या शारीरिक क्षमतेनुसार नोकरीत सामावून घेण्यासाठी हंसराज अहीर यांच्या सुचनेनुसार जुन मध्येच कोल इंडीयाकडे प्रस्ताव सादर केल्याचे अध्यक्ष प्रबंध निदेशकांनी सांगीतले. प्रकल्पग्रस्त उमेदवारांना अधिग्रहीत क्षेत्रातच नोकरी देण्याबाबतच्या विषयावर महिलांना त्याच क्षेत्रात नोकरी दिली जाईल असे प्रबंधनाव्दारे स्पष्ट करण्यात आले. अन्य प्रकल्पग्रस्तांबाबत वरीष्ठ स्तरावरून मार्ग काढण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन दिले. यावेळी पोवनी, मुंगोली, मार्डा आदी गावांच्या पूनर्वसनाबाबत चर्चा झाली. मुंगोली व मार्डा गावाचे लवकरच पुनर्वसन प्रक्रीया मार्गी लावू असे मान्य केले. पोवनी येथील उर्वरीत भूमिअधिग्रहणा बाबत सिएमपीडीआयएल व्दारा सव्र्हें केला जाईल असे सांगीतले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने