Top News

सिंदेवाही तालुका शिक्षक भारती संघटना गठीत. #Sindewahi

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) विरेंद्र का. मेश्राम, सिंदेवाही
सिंदेवाही:- सिंदेवाही तालुका येथे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक भारती संघटना मा.राजेंद्र झाडे राज्य उपाध्यक्ष शिक्षक भारती यांच्या उपस्थितीत ग्रामीण विकास सेवक सहकारी पतसंस्था सिंदेवाही येथे सभा आयोजित करण्यात आली.

सभेमध्ये सिंदेवाही तालुका अध्यक्ष म्हणून विनय सुदामराव खोब्रागडे यांची नियुक्ती करण्यात आली. तर उपाध्यक्ष मा.विकास गणपतराव पाकेवार, कार्यवाह म्हणून राजेश बबनराव मोरे, सहकार्यवाह अजय रामाजी निकोडे, कोषाध्यक्ष मा.संजय महादेव दुधबावरे, कार्याध्यक्ष नामदेव माधव तोंडफोडे , संघटक सहदेव शांताराम खोब्रागडे, भारत आत्राम, प्रसिद्ध प्रमुख अतुल अरविंद ठाकरे, मनोज सोमा मेश्राम, सदस्य  प्रकाश सितकुरा नर्मलवार, धनराज केशव साखरे,  सचिन शामराव पाटील या तालुका कार्यकारिणी चे गठन करण्यात आले. त्यावेळी उपस्थित  संजय खेडीकर सर, भाऊराव पत्रे सर, सुरेश डांगे सर, भाष्कर बावनकर सर, वारजुरकर सर, मोगरे सर,सौ.शेंडे मॅडम, या मान्यवरांच्या उपस्थितीत सर्वांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
     
    सर्व मान्यवरांनी मनोगत व्यक्त करतांना १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन ही आमच्या हक्काची ती मिळवणे हा  आमचा अधिकार आहे. तो आपण मिळवून हा मुद्दा ठामपणे सांगितले. वरीष्ठ श्रेणी पात्र कर्मचारी  या विषयीची माहिती दिली. शिक्षकेतर कर्मचारी यांच्या समस्या विषयी माहिती दिली.या नवनियुक्त तालुका कार्यकारिणी च्या माध्यमातून नक्कीच एक नवचैतन्य निर्माण झाले याचे सर्वांना आनंद झाले.  सभेचे संचालन, बारीकराव खोब्रागडे यांनी केले. तर आभार कैलास सर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी रित्या पार पडला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने