Click Here...👇👇👇

रंजीत उगे यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांगाला धान्य किट वाटप. #Socialwork

Bhairav Diwase
छावा फाउंडेशन राजुरा चा पुढाकार.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- सामाजिक कार्यकर्ते रंजीत उगे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त वाघोबा साखरी येथील डोळ्यांनी दिव्यांग असलेले दिलीप झुंगरे यांना धान्याची किट देऊन वाढदिवस साजरा केला. त्यांच्या या कार्यात राजुरा येथील छावा फाउंडेशन ने पुढकार घेतला.#Adharnewsnetwork
छावा फाउंडेशन राजुरा तर्फे मित्र परिवारातील सभासदांचा वाढदिवस नेहमी सामाजिक उपक्रम साजरे करून करण्यात येतो. रंजित उगे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून धान्य किट वाटप घेण्यात आले. यावेळी छावा फाऊंडेशनचे अध्यक्ष आशिष करमरकर, उपाध्यक्ष बबलू चव्हाण, सचिव आकाश वाटेकर, कोषाध्यक्ष संदीप पोपला, प्रशांत वाटेकर, देवकिशन वनकर, सुजित कावळे, कुणाल पिंपळशेंडे, लुकेश बुटले, विक्की तुमराम आदींची उपस्थिती होती. #Socialwork