जाहिरात... Advertisement... विज्ञापन

सचिन तेंडुलकर वाघाच्या भेटीला; पत्नीसह जंगल सफारी. #Tiger


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चिमूर:- भल्याभल्यांना ताडोबाच्या वाघाने भुरळ घातली आहे. अनेक सेलिब्रिटी कलावंत, क्रिकेटर वाघाच्या भेटीला ताडोबात येत असतात. #Tiger
अशातच क्रिकेटचा देव भारतरत्न सचिन तेंडुलकर, पत्नी अंजली व मित्र परिवार शनिवारी ताडोबात दाखल झाले. एका खासगी रिसोर्टमध्ये त्यांचा मुक्काम असून शनिवारी सायंकाळी ४ वाजता मदनापूर बफर गेटमधून त्यांनी जंगल सफारी केली. #Adharnewsnetwork
सचिन तेंडुलकर याच वर्षी २६ जानेवारीला कोलारा गेटवर चार दिवस पत्नी व मित्रांसह मुक्कामाने आला होता. तेव्हा कोलारा गेट, अलिझंझा गेट, मदनापूर गेट, बेलारा गेटवरून सफारी केली असता त्यांनी १२ वाघांचे दर्शन घेऊन निरोप घेतला होता. सर्व जण तीन दिवस मुक्कामी असतील.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत