Top News

गोंडवाना विद्यापीठातील विविध पुरस्कार जाहीर. #University



(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
गडचिरोली:- गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथील सन २०२०-२१ करिता उत्कृष्ट कार्याबद्दल जीवनसाधना गौरव पुरस्कार, उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार, उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार, उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार, बेस्ट कोविड वीर पुरस्कार, विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी तसेच विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी शिक्षण क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल पुरस्कार प्रदान करण्यासाठी अंतिम निवड यादी घोषित झाली आहे.#Adharnewsnetwork
जीवन साधान गौरव पुरस्कारासाठी डाॅ. तुळशीराम विठुजी गेडाम (तळोधी बाळापुर) यांची निवड करण्यात आली आहे. तसेच उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कारासाठी नेवजाबाई हितकारणी महाविद्यालय ब्रह्मपुरी, उत्कृष्ट शिक्षक पुरस्कारासाठी खत्री महाविद्यालय चंद्रपूर येथील डाॅ. प्रवीण तेलखेडे व डाॅ. आंबेडकर कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, चंद्रपूर येथील डाॅ. विजूताई यादवराव गेडाम यांची निवड करण्यात आली आहे.
पदव्युत्तर शैक्षणिक विभागातील उत्कृष्ट शिक्षक पुरस्कारासाठी गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथील डाॅ. शैलेंद्र दामोदर देव, उत्कृष्ट विद्यापीठ अधिकारी पुरस्कारासाठी (वर्ग २) गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथील संदेश देविदास सोनुले, उत्कृष्ट विद्यापीठ कर्मचारी पुरस्कारासाठी (वर्ग ३) सुचिता भैयाजी मोरे उच्चश्रेणी लिपिक गोंडवाना विद्यापीठ, उत्कृष्ट विद्यापीठ कर्मचारी पुरस्कार (वर्ग ४) देविदास रामाजो नागपुरे, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कारासाठी चिंतामण महाविद्यालय पोंभुर्णा येथील अतुल दिनकरराव अल्याडवार, उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कारासाठी पदव्युत्तर शैक्षणिक विभाग गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथील सूरज प्रभाकर चौधरी, उत्कृष्ट विद्यार्थिनी पुरस्कारासाठी नेहा एम. समनपल्लीवार सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर, बेस्ट कोविड वीर पुरस्कारासाठी कोरची येथील वनश्री कला महाविद्यालयातील प्रा. प्रदीप केशव चापले यांची निवड करण्यात आली आहे.
विद्यापीठाच्या १० व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून २ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता गोंडवाना विद्यापीठांमध्ये आयोजित कार्यक्रमात पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात येणार असल्याची माहिती गोंडवाना विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डाॅ. अनिल चिताडे यांनी दिली.#University

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने