Top News

स्वराज्य ध्वज यात्रेचे भद्रावती शहरात जंगी स्वागत. #Welcome



(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे, भद्रावती
भद्रावती:- महाराष्ट्रातील ३६ जिल्हे, भारतातील ६ राज्ये आणि ७४ प्रेरणास्थळांना भेट देणा-या स्वराज्य ध्वज यात्रेचे दि.१६ सप्टेंबर रोजी येथील जैन मंदिरात आगमन झाले असून या यात्रेचे जंगी स्वागत करण्यात आले.#Adharnewsnetwork
दसऱ्याच्या मुहूर्तावर या स्वराज्य ध्वजाची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. हा ध्वज भगव्या रंगाचा असून ७४ मीटर लांब व ९० किलो वजनाचा आहे. तो देशातीलच नव्हे तर जगातील सर्वात उंच ध्वज असेल असा दावा करण्यात येत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड येथील शिवपट्ट्ण अर्थातच भुईकोट किल्ल्याच्या आवारात ध्वजस्तंभ तयार झालेला आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथील गोदड महाराज मंदिरातातून गुरूवारी आमदार रोहित पवार यांच्या ध्वज पूजनानंतर स्वराज्यध्वज यात्रेला सुरूवात झाली. १२ हजार किलोमीटरचा प्रवास करून स्वराज्य ध्वज पुन्हा महाराष्ट्रात येणार आहे. महाराष्ट्रातील ३६ जिल्हे, भारतातील ६ राज्ये, ७४ प्रेरणास्थळे अशी ही यात्रा असेल. दिनांक १६ सप्टेंबर रोजी या ध्वज यात्रेचे भद्रावती शहरात आगमन झाले असता जंगी स्वागत करण्यात आले.यावेळी स्वराज्य ध्वज समन्वयक नाना गवळी,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रतिनिधी मुनाज शेख,तालुका अध्यक्ष सुधाकर रोहनकर ,महीला शहर अध्यक्ष सबिया देवगडे, कामगार सेल जिल्हा अध्यक्ष फयाज शेख,राष्ट्रवादी युवक काॅंग्रेस विधानसभा अध्यक्ष अभिजीत कुडे, शहर अध्यक्ष रोहन कुटेमाटे, शहर उपाध्यक्ष सूरज भेले, क्रिष्णा तुराणकर,रोशन कोमरेड्डीवार, अमोल बडगे ,राकेश किनेकर, विद्यार्थी अध्यक्ष आशिष लिपटे,शहर महासचिव संतोष वासमवार,निलेश जगताप , सौरभ घोटेकर, मिलिंद रामटेके ,ओंकार पांडे ,बिपिन देवगडे, गणेश गणविर,शुभम किटे, गौरव आमटे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी मुनाज शेख यांनी स्वराज्य आरती करुन पूजा केली.
    यावेळी पत्रकारांशी बोलताना स्वराज्य ध्वजाचे समन्वयक नाना गवळी म्हणाले की, कर्जत-जामखेडचे आमदार रोहीत पवार यांच्या संकल्पनेतून हा ध्वज तयार करण्यात आला आहे. दि.६ जून १६७४ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता. या दिवसाची आठवन म्हणून या ध्वजाची उंची ७४ मीटर ठेवण्यात आली आहे. हा ध्वज कोणत्या एका धर्माचा, जातीचा किंवा राजकीय पक्षाचा नसून तुमचा-आमचा सर्वांचा आहे.ही ध्वज यात्रा निघाल्याला ७ दिवस पूर्ण झाले आहेत. आणखी २० ते २५ दिवस ही यात्रा भ्रमंती करेल. त्यानंतर समारोप करण्यात येईल.आतापर्यंत ७४ मंदिरांना भेट देऊन प्रत्येक मंदिराला ध्वजाची प्रतिमा बहाल करण्यात आली असेही गवळी म्हणाले.#Welcome

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने