सूरज गावंडे यांची काॅंग्रेसच्या शहर अध्यक्षपदी नियुक्ती. #Selection

Bhairav Diwase


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे, भद्रावती
भद्रावती:- येथील सामाजिक कार्यकर्ते सूरज गावंडे यांची भद्रावती शहर काॅंग्रेस अध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली.
दि.१६ सप्टेंबर रोजी येथील स्वागत सेलिब्रेशन सभागृहात पार पडलेल्या सरपंच सत्कार, काॅंग्रेस प्रवेश व कार्यकर्ता मेळाव्यात गावंडे यांना मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.
यावेळी क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार,खा. बाळूभाऊ धानोरकर, आ.प्रतिभाताई धानोरकर, आ.अभिजीत वंजारी,आ.सुभाष धोटे, काॅंग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे, जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे आणि इतर मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या नियुक्तीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.#Selection