मॅग्मो संघटनेने दि. 20 ऑक्टोबरपासून पुकारलेला संप मागे. #Doctor

Bhairav Diwase

चंद्रपूर:- दिनांक 20 ऑक्टोबरला मॅग्मो संघटनेने मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, चंद्रपूर यांना निवेदन देवून नेरी येथील वैद्यकिय अधिकारी यांचे एकतर्फि, बिनाचौकशी निलंबन मागे घेणेसंबंधी निवेदन देण्यात आले होते.
मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मॅग्मो संघटनेने मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करुन सदर प्रकरणी चौकशी समिती गठीत करुन वैद्यकिय अधिकारी यांना पुर्नस्थापित केले आहे. सदर प्रकरणी निवेदनामध्ये केलेली मागणी मान्य केल्यामुळे मॅग्मो संघटना, चंद्रपूर दिनांक 20 ऑक्टोबरपासून पुकारलेला संप मागे घेण्यात आला.