भव्य आँनलाईन घरघुती गणेश उत्सव स्पर्धा 2021चे बक्षिस वितरण संपन्न. #Gondpipari

Bhairav Diwase

माजी आमदार अँड. संजय धोटे यांच्या हस्ते केले बक्षिस वितरण.

भारतीय जनता पार्टी गोंडपिपरी शहर यांचा अनोखा उपक्रम.
गोंडपिपरी:- भारतीय जनता पार्टी गोंडपीपरी शहराच्या वतीने भव्य आँनलाईन घरघुती गणेश उत्सव सजावट स्पर्धेचे दिनांक 10 सप्टेंबर 2021 ते 19 सप्टेंबर 2021पर्यत आयोजन करण्यात आले होते,या स्पर्धे मध्ये अनेक स्पर्धकांनी भाग घेतला होता,स्पर्धेत अनेक बक्षिसांची मेजावणी ठेवण्यात आली होती,यामध्ये एक दिवसाचा गणपती, पाच दिवसाचा गणपती व दहा दिवसाचा गणपती या सर्व स्पर्धेत सहा बक्षिसे देण्यात आले होते,एक दिवसाच्या गणपती प्रथम क्रमांचा बक्षिस केतकी चनावर व दृतीय क्रमांकाचे बक्षिस जनार्धन झाडे यांना देण्यात आले,पाच दिवसाच्या गणपती स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे बक्षिस वेदांत पोटवार यांना तर दृतीय बक्षिस संजय नरणले यांना देण्यात आले,तसेच दहा दिवसांच्या गणपती सजावट स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे बक्षिस कमलाकर वांढरे यांना तर दृतीय क्रमांकाचे बक्षिस राजेश सोनटक्के यांनी पटकावले आहे.

या स्पर्धेचे बक्षिस वितरण राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार अँड संजय धोटे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी बोलताना अँड,संजय धोटे म्हणाले की कोरोना मध्ये शासनाच्या दिलेल्या नियमांचे पालन करून आपण या स्पर्धेचे आयोजन उत्तम प्रकारे केले असून यापुढे उत्तम कार्य आपल्या हातून होईल अशी आशा बाळगतो,भाजपा गोंडपीपरी शहर अनेक समाज उपयोगी कार्यक्रम राबवत असतात कोविड मध्ये गरजू लोकांना मदत करणे,आरोग्यासाठी सहकार्य करणे अशे अनेक मदत करण्यात आले असून आगामी नगरपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी आपण खंबीर पणे उभे राहाल अशी आशा ठेवते,याप्रसंगी सर्व विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन शुभेच्छा दिल्या,यावेळी भाजपा महिला आघाडी शहर अध्यक्षा सौअरुणा जांभुळकर यांनी एल.एल.बीचे शिक्षण पूर्ण केल्याबद्दल माजी आमदार अँड संजय धोटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला,तसेच कर्णबधिर अभय फ़ुलझले यांना सुद्धा यावेळी मशीन देण्यात आली.


यावेळी मंचावर भाजपाचे तालुका अध्यक्ष बबन निकोडे,भाजपचे जेष्ठ नेते दिपक बोनगिरवार, भाजपचे नेते सुहास मांडूरवार,निलेश संगमवार ,भाजपचे शहर अध्यक्ष चेतनसिंह गौर,,नगरपंचायत सभापती राकेश पुन,जिल्हा परिषद सदस्य सौ स्वाती वडपलीवार,माजी नगराध्यक्ष संजय झाडे,भाजप नेते अमर बोडलावार,सुनिल फुकट,भाजपचे नेते गणपती चौधरी,भाजप नेते ,साईनाथ मास्टे,माजी उपसभापती मनिष वासमवार,भाजयुमो राजुरा तालुका महामंत्री रवि बुरडकर,भाजयुमो शहर अध्यक्ष प्रशांत येल्लेवार,बंटी बोनगीरवार, प्रवीण धोंडरे आदी मान्यवर उपस्थित होते.