Top News

इथे सदोदित वाहत असतो माणुसकीचा झरा..... #Article


देवदूत बनून सरसावतात डॉ विवेक एन. लांजेकर...
ज्या मातीत खेळलो, ज्या मातीत लहानाचे मोठे झालो, त्याच मातीत, त्याच सवंगडयासोबत पुन्हा एकदा भेटण्याचा योग हा आजच्या काळात खूप कमी दा येतो. जीवन जगत असताना आपण एक उच्च पदावर जेव्हा असतो तेव्हा आपल्या बालपणीच्या मित्रांना मदत करणे आजच्या कृष्णाला बरेचदा जमत नाही, म्हणून आजचा सुदामा तसाच राहतो आपल्या भविष्याचा वेध घेत आणि मित्राच्या मदतीची अपेक्षा करत पण चंद्रपूर मध्ये काही वेगळेच दृश्य बघायला मिळते.

जवाहर नवोदय विद्यालय, तळोधी (बा.) हे जिल्ह्यातील एकमेव नवोदय या विद्यालयातून हर वर्षी शेकडो विद्यार्थी बाहेर पडतात आणि कुठे तरी चांगल्या पगाराच्या नोकरीवर लागतात. पण नवोदय विद्यालयाचे ऋण या विद्यार्थ्यांना स्वस्थ बसू देत नाही याचेच एक उदाहरण म्हणजे दुर्गापूर रोड वर इंडियन ऑइल पेट्रोल पंप जवळ असलेला डॉ. विवेक एन. लांजेकर यांचा दवाखाना. नवोदय विद्यालयाचे असलेले हे एक माजी विद्यार्थी आजही आपल्या नवोदय परिवाराची सेवा करतात तेही कुठलीच मदतीची अपेक्षा न बाळगता, नवोदय परिवारातील रुग्णाने पैश्याची गोष्ट केल्यास मला नवोदय ने खूप दिले, आज मी खूप समाधानी आहे असे प्रतिउत्तर ऐकायला मिळते.
एकविसाव्या शतकात सामाजिक बांधिलकी लुप्त पावत चालली आहे याला अपवाद ठरतेय ती डॉ विवेक लांजेकर यांची निस्वार्थ सेवा.
कोरोना महामारी, डेंगू, मलेरिया, टायफाईड व अन्य कुठल्याही आजाराने ग्रस्त नवोदय परिवारातील सदस्यांची हे निशुल्क सेवा करतात.

त्याचबरोबर आज अन्य क्षेत्रात असलेले नवोदय चे विद्यार्थी पण आपल्या सवंगडयाना मदत करायला नेहमी पुढे असतात, आजच्या धकाधकीच्या काळात अश्या थोर विचारांचे लोक मिळणे कठीणच हि सर्व देन आहे ती नवोदय ने दिलेल्या संस्कृतीची.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने