युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांची ठाणेदारांसोबत विविध समस्यांवर चर्चा. #Bhadrawati

Bhairav Diwase
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- भद्रावती येथील युवा तथा युवती सेना यांच्या पदाधिका-यांनी भद्रावती पोलीस स्टेशनचे नवीन रुजू ठाणेदार गोपाल भारती यांची भेट घेऊन शहरातील विविध समस्यांवर चर्चा केली.
यावेळी शहरातील अवैध धंद्यावर आळा घालुन शहरातील नागरिकांमध्ये सुरक्षीततेची भावना निर्माण करावी अशी मागणी करण्यात आली.
प्रथम भद्रावती पोलीस स्टेशनला नव्यानेच ठाणेदार पदावर रुजू झालेले नवे ठाणेदार गोपाल भारती यांचे युवा व युवती सेनेद्वारे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर शहरातील वेगवेळ्या गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या समस्यांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी युवा सेना चंद्रपूर जिल्हा विस्तारक नित्यानंद त्रिपाठी व युवती सेना जिल्हा विस्तारक कृष्णाताई गुजर यांच्या मार्गदर्शनात तसेच युवा सेनेचे जिल्हा प्रमुख हर्षल शिंदे यांच्या नेतृत्वात ही भेट घेण्यात आली. यावेळी युवा सेना शहर प्रमुख उमेश काकडे, उपशहर प्रमुख कल्याण मंडल, संदीप चटपकर ,अमोल कोल्हे, शैलेश पारेकर, नितीन गेडाम ,सुभाष खोबरे, युवती उपजिल्हा संघटक पूजा सराटे, शिव गुडमल, तालुका अधिकारी नेहा बनसोड, तालुका समन्वयक सीमा लेडांगे, शिवानी जोगी ,साक्षी खापणे, निकिता बोढाले ,संध्या मेश्राम,, मंजू गेडाम, प्रशांत दुबे ,कैलास साखरकर, नरेश डहाके ,खुशाल तेहलरमानी ,भाऊराव राजूरकर ,गजानन चव्हाण, दिनेश बडकेलवार आदी युवा सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.