उच्च शिक्षित युवकांची भजनातून जागृती तीनशेहून अधिक ठिकाणी गायले भजन. #Bhajan

Bhairav Diwase

सिंदेवाही:- सिंदेवाही तालुक्यातील सरडपार येथील कोठेवार बंधुंनी श्रीकृष्ण युवा भजन मंडळ स्थापन केले आहे. भजनाच्या माध्यमातून ते अविरत जनजागृती करीत असून, भक्तीचे वातावरण तयार करून नागरिकांना मनमुराद आनंदही देत आहेत.
तालुक्यात या भजन मंडळाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. तालुक्यातील जवळच असलेले सरडपार या गावातील रहिवासी कोहळी समाजाचे कोठेवार बंधुनी भजन मंडळ स्थापन केल्यानंतर, आतापर्यंत तीनशेहून अधिक भजन सादर केले आहेत.
संदीप, चेतन, विकास, विजय, आकाश, रोहित, सौरभ, शुभम कोठेवार, आशिष सहारे व प्रतीक शेंडे या दहा युवकांचे हे मंडळ आहे.
सर्वच युवक शिक्षित आहेत. गणपती उत्सव, दुर्गा उत्सव, श्रावण महिन्यातील सोमवार व धार्मिक कार्यक्रमात भजन, तसेच गवळणही गातात.