प्रकल्पग्रस्तांच्या न्यायमागण्यांसाठी १३ आक्टोंबरला भाजप मैदानात! #BJP

Bhairav Diwase
कर्नाटक एम्टा कंपनीविरुद्ध आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांची वरोरा येथे बैठक संपन्न.

आंदोलनाची कंपनी प्रशासनाला धास्ती, कार्यकर्त्यांनी यशस्वीतेसाठी एकत्र यावे.:- जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे
वरोरा:- भद्रावती तालुक्यातील बरांजस्तित कर्नाटक-एम्टा कोळसा उत्खनन कंपनीने मनमर्जीचे धोरणसत्र राबवून स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष केले आहे.

याविरोधात येत्या १३ आक्टोंबरला भारतीय जनता पार्टी चंद्रपूर जिल्ह्याच्या वतीने राज्याचे माजी मंत्री तथा लोकलेखा समिती प्रमुख आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात मोठे आंदोलन केले जाणार आहे. त्या पाश्र्वभूमीवर आज वरोरा येथिल आशीर्वाद मंगल कार्यालयात नियोजन बैठक जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.
येत्या १३ तारखेला स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या रास्त न्यायमागण्यांसाठी भाजपतर्फे होणार्‍या या आंदोलनात जिल्ह्यातील भाजपचे सर्व नेते, पदाधिकारी उपस्थित रहाणार आहेत. आणि कंपनी प्रशासनाकडून सुरू असलेल्या हिटलरवादी धोरणाचे निषेध व्यक्त केले जाणार आहे. यामुळे भाजपच्या या आंदोलनाची कर्नाटक-एम्टा कंपनीने धास्ती घेतली आहे. त्यामुळे हे आंदोलन नियोजनबद्ध पद्धतीने यशस्वी होण्यासाठी आपण सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन परिश्रम घ्यावे. अशा सूचना जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी यावेळी केल्या.
या बैठकीला, जिल्हा महामंत्री नामदेव डाहुले, भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, तालुका महामंत्री नरेन्द्र जिवतोडे, वरोराचे नगराध्यक्ष अहेतेश्याम अली, तालुकाध्यक्ष डॉ. भगवान गायकवाड, शहराध्यक्ष सुरेश महाजन, जेष्ठ नेते बाबासाहेब भागडे, नगरसेवक अनिल साखरिया, दिलीप घोरपडे, जिल्हा सचिव रोहिणी देवतळे, नगरसेविका सुनीता काकडे, रेखा समर्थ, भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष करण देवतळे, अमित चवले युवा मोर्चाचे अमोल देवुडकर, सायरा शेख, कीर्ती कातोरे, राहुल बांदुरकर, निलेश देवतळे, विनोद लोहकरे, विठ्ठल लेडे, राजेश साकोरे, अभिजित गयनेवार, जगन दाखने, सुनील समर्थ आशिष रणदिवे, दादू खंगर यांसह तालुक्यातून भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.