Top News

नवेगाव मोरे येथे काँग्रेस कार्यकर्ता मेळावा.

पोंभूर्णा येथे कार्यकर्ता बैठक.


पोंभूर्णा :- भाजपा सरकार हे सर्वसामान्य व गोरगरीबांचे कंबरडे मोडणारे सरकार असून विकासाच्या नावाखाली वस्तुंची दरवाढ करीत देशवासीयांची फसवणूक करीत आहे.
शेतीप्रधान देशात शेतकऱ्यांचे न ऐकणारा भाजप सरकार देश विकायला काढला आहे.अशी खोचक टिका यावेळी करण्यात आली.पोंभूर्णा तालुक्यातील नवेगाव मोरे येथील काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात खासदार बाळू धानोरकर मार्गदर्शन करतांना बोलत होते.
उद्घाटक खासदार बाळु धानोरकर, जिल्हा काँग्रेस कमेटी ग्रामीण अध्यक्ष प्रकाश देवतळे, तालुका अध्यक्ष कवडू कुंदावार, यांच्या प्रमुख उपस्थितीत,महिला जिल्हा अध्यक्ष चित्राताई डांगे, घनश्याम मुलचंदानी, भास्कर माकोडे, प्रकाश मारकवार, बापूजी चिंचोलकर, रुषी पोल्लेलवार, साईनाथ शिंदे, नवेगाव मोरे सरपंच गजानन सेमले,उपसरपंच रेखा मोरे,बालु कावरे,स्वप्नील ढवस, गिरीधर मोरे आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलताना धानोरकर म्हणाले की नवेगाव मोरे क्षेत्रात पंचायत समिती व जिल्हा परिषदेत भाजपाची सत्ता असूनसुद्धा गावखेड्याचा कोणताही विकास झाला नाही. बेरोजगारी वाढलेली आहे.सिंचनाची सोय नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी कोणतीही योजना राबविण्याच्या अनुषंगाने पावले उचलली नाहीत.असा खोचक सवालही त्यांनी उपस्थित केला.
---------------------------------
पोंभूर्ण्यात काॅंग्रेस कार्यकर्ता बैठक.

पोंभूर्णा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात तालुका व शहर काँग्रेस कार्यकर्ता बैठक पार पडली. पोंभूर्णा नगरपंचायतच्या आगामी निवडणुकीचे वेध घेता खासदार धानोरकर यांनी पोंभूर्ण्यात झालेल्या सिमेंटच्या विकासाचा खरपुस समाचार घेतला.यावेळी बोलताना खासदार धानोरकर म्हणाले की पोंभूर्णा शहरात फक्त सिमेंटचे कामं करून ठेकेदाराचे पोट भरले आहे. विकासाच्या नावाखाली स्वताची पाठ थोपटून गाजावाजा करणाऱ्या लोकप्रतिनिधीने सामान्य जनतेसाठी, शेतकऱ्यांसाठी, बेरोजगारांसाठी काहीही केले नाही. अशी टिका करत भाजपवर जनता नाराज असून जनतेसाठी काॅंग्रेस हा पर्याय आहे. येणाऱ्या नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेसची सत्ता स्थापन करण्यासाठी सर्व काॅंग्रेस कार्यकर्त्यांनी शक्तीने काम करण्याची व नगरपंचायतीत काॅग्रेसची सत्ता स्थापन करण्याचा आशावादही त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी शहर व तालुका काॅंग्रेस कमेटीचे पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने