Top News

युवा वॉरियर्स शाखा युवकांना न्याय देण्याचे केंद्र ठरेल:- जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे.


पळसगाव येथे भारतीय जनता युवा मोर्चा शाखा फलकाचा अनावरण सोहळा संपन्न.
ब्रम्हपुरी:- युवा मोर्चा ची उंच भरारी जिल्हाध्यक्ष आपल्या दारी या संकल्पनेतून ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रातील पळसगाव, नवरगाव गावामध्ये भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून युवा वारियर्स शाखा फलकाचे अनावरण कार्यक्रम संपन्न झाला व यानंतर कार्यकर्ता बैठक  पार पडली. युवा वारियर्स शाखेचे फलक अनावरण भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष आशिष भाऊ देवतळे यांच्या हस्ते व जि.प समाजकल्याण सभापती मा. नागराजभाऊ गेडाम व भाजप तालुका अध्यक्ष राजेंद्रजी बोरकर,  यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
भा.ज.यु.मो जिल्हा अध्यक्ष आशिषभाऊ देवतळे यांच्या युवा संवाद यात्रेची सुरवात ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघातील नवरगाव येथून झाली.

या प्रसंगी जिल्हा महामंत्री मिथिलेश पांडे भाजयुमो तालुका अध्यक्ष रितेश अलमस्त, जिल्हा उपाध्यक्ष ओम पवार, जिल्हा सचिव तनय देशकर, जिल्हा सचिव पूनेश गांडलेवार, जिल्हा सचिव रोशन मुद्दमवार, भाजयुमो तालुकाध्यक्ष रितेश अलमस्त, कामगार नेता मनीष रामील्ला यांच्या सह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

या प्रसंगी नवरगाव भाजपा अध्यक्ष प्रकाशजी खोब्रागडे, जिल्हा महामंत्री मिथिलेश पांडे भाजयुमो तालुका अध्यक्ष रितेश अलमस्त, जिल्हा उपाध्यक्ष ओम पवार, जिल्हा सचिव तनय देशकर, जिल्हा सचिव पूनेश गांडलेवार, जिल्हा सचिव रोशन मुद्दमवार, भाजयुमो तालुकाध्यक्ष रितेश अलमस्त, कामगार नेता मनीष रामील्ला,नगर अध्यक्ष मनिष घुघुसकर, भाजपा तालुका महामंत्री मनोहरराव सहारे, रामदासजी दुर्किवार, संजय बोडणे, संजय गभणे, मुकेश गाडेकर, युवराज लांजेवार, भोलाराम इंदुलवार, अमोल लोखंडे, संजय परसरामे, मनोज लांजेवार, नामदेवराव बोरकर यांच्या सह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने