आंदोलनकर्त्यांकडून "मयूर शिव भोजनालया"ची तोडफोड! #Chandrapur

Bhairav Diwase
महा विकास आघाडीनेचं केली होती शिव भोजनालयाची घोषणा!

आंदोलनकर्त्यांना याचाच पडला विसर?
चंद्रपूर:- लखीमपूर हत्याकांडाच्या निषेधार्थ तसेच काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांना तुरुंगात डांबले याच्या आरोप करीत महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी ने महाराष्ट्र बंद पुकारला होता. या बंद दरम्यान काही उत्साही कार्यकर्त्यांनी चंद्रपूर शहरातील बस स्टॅन्ड समोर असलेल्या "मयूर शिवभोजनालयात" शिरून शिव भोजनालय बंद करण्यात यावे यासाठी तोडफोड केली.
महाराष्ट्र शासनाच्या संकल्पने मधून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गरीब बांधवांना अन्न मिळावे यासाठी ही योजना सुरू करण्यात आली, मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने सुरुवात करण्यात आलेल्या या योजनेचे थाटात उद्घाटन केले होते. कोरोणा काळामध्ये गरिबांना अन्न मिळावे यासाठी ही योजना सुरू होती. महाविकासआघाडी ने आजच्या बंद दरम्यान आंदोलनकर्त्यांनी "मयूर शिवभोजनालया" ची तोडफोड केली. आंदोलनकर्त्यांना महाविकासआघाडी ने या योजनेची सुरुवात केली असल्याच्या बहुतेक विसर पडला असेल त्यामुळेच "मयूर शिवभोजनालय" ची आंदोलनकर्त्याकडून झालेली तोडफोड ही गंभीर बाब आहे.
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये "शिव भोजनालया"ची संकल्पना सुरू झाल्यानंतर चंद्रपूर शहरात बस स्टँड समोर असलेल्या "मयूर शिव भोजनालया" चे उद्घाटन चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार विजय वडेट्टीवार, चंद्रपूर शहराचे आमदार किशोर जोरगेवार यांनी केले होते व त्या संबंधात विविध वर्तमानपत्रांमध्ये त्या छायाचित्रासह वृत्त ही प्रकाशित झाले होते. त्याच "मयूर शिव भोजनालय" ची महा विकास आघाडीने आयोजित केलेल्या दरम्यान आंदोलनकर्त्यां कडून तोडफोड करण्यात आली, नुकसान करण्यात आले ही बाब भयावह आहे, या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शिवभोजनालयाचा लाभ घेणाऱ्यांनी केली आहे. अल्ला माहितीनुसार मयूर भोजनालया चे संचालक या संबंधात तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये गेले असल्याची माहिती मिळाली आहे परंतु काही आंदोलन करत यांनी अशी तक्रार होऊ नये यासाठी संचालकांवर दबाव आणल्याची अधिकृत माहिती आहे.