Top News

आरोग्‍य विभागाच्‍या भोंगळ कारभारामुळे आरोग्‍य मंत्र्यांनी राजीनामा द्यावा:- विशाल निंबाळकर. #Chandrapur


आरोग्‍य विभागाच्‍या परिक्षांमध्‍ये दुस-यांदा गोंधळ.
चंद्रपूर:- महाराष्‍ट्र शासनाच्‍या आरोग्‍य विभागाच्‍या विविध पदांसाठीच्‍या लेखी परिक्षेचे आयोजन काल करण्‍यात आले होते. परंतु कित्‍येक विद्यार्थ्‍यांना दोन भागात होणा-या परिक्षांचे ओळखपत्र वेगवेगळया गावातले प्राप्‍त झाले. त्‍यामुळे विद्यार्थ्‍यांना प्रचंड मनस्‍ताप झाला. कित्‍येक विद्यार्थ्‍यांनी या विरुध्‍द ठिकठिकाणी आंदोलने केली.
यापूर्वीही हीच परिक्षा आरोग्‍य विभागातर्फे घेण्‍यात येणार होती. परंतु त्‍यावेळी तर दोन परिक्षांचे केंद्र वेगवेगळया राज्‍यांमध्‍ये घेण्‍यात आले होते. त्‍यामुळे ही परिक्षा तेव्‍हा रद्द करण्‍यात आली होती. आताही पुन्‍हा ज्‍या संस्‍थेला हे काम दिले त्‍या संस्‍थेने प्रचंड घोळ घालत परिक्षेत गोंधळ निर्माण केला. खरे तर या सर्व प्रकाराची जबाबदारी आरोग्‍य विभागाचे मंत्री म्‍हणून डॉ. राजेश टोपे यांची आहे. त्‍यांना थोडीही चाड शिल्‍लक असेल तर त्‍यांनी मंत्रीमंडळातून ताबडतोब राजीनामा द्यावा असे प्रतिपादन भारतीय जनात युवा मोर्चाचे महानगर जिल्‍हाध्‍यक्ष श्री. विशाल निंबाळकर यांनी चंद्रपूर येथे आयोजित महाकविकास आघाडी सरकारच्‍या आरोग्‍य विभागाच्‍या निषेधार्थ आयोजित सभेत केली.
या सभेत महामंत्री प्रज्‍वलंत कडू, उपाध्‍यक्ष कुणाल मस्‍के, अभि वांढरे, मनोज पोतराजे, रामनारायण रविदास, श्रीकांत येलपुलवार, सतिश तायडे, सत्‍यम गाणार, आशिष ताजने, बंडू गौरकार, भाजयुमो मंडळ अध्‍यक्ष हिमांशू गादेवार, संजय पटले, गणेश रामगुंडावार, अमित गौरकार, भाजयुमो सोशल मिडिया संयोजक सचिन यामावार, मंडळ सचिव मयुर गोयन, चैतन्‍य कापूरकर, पराग कुत्‍तरमारे, भाजपा मंडळ महामंत्री विवेश शेंडे, सागर भगत, दिपक कडू, बाबूपेठ मंडळ महामंत्री विवेक शेंडे, युवा मोर्चा उपाध्‍यक्ष श्रीकांत येलपुलवार, आयुष दानव, रिंकेश ठाकरे, नितेश वाढई, आकाश पाका, कुणाल निकोडे, गौरव निकोडे, आदित्‍य रामटेके, सचिन गौरकार, विपीन कारमोरे, विपीन निंबाळकर यांची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने