💻

💻

चिंतामणी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी कोविड-19 लसीकरण मोहीमेचे विशेष शिबिर संपन्न. #vaccination.


राष्ट्रीय सेवा योजना विभाग व मिशन युवा स्वास्थ्य यांच्या संयुक्त विद्यमाने शिबिराचे केले आयोजन.

गोंडपिपरी:- श्री समर्थ शिक्षण संस्था अहेरी द्वारा संचालित चिंतामणी कॉलेज ऑफ आर्टस् अँड सायंन्स गोंडपिपरी येथील "राष्ट्रीय सेवा योजना विभाग व मिशन युवा स्वास्थ्य" यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी कोविड -19 लसीकरण मोहीमेचे विशेष शिबिर दि. 25 ऑक्टोबर 2021 रोजी संपन्न झाले.
कोविड -19 लसीकरण शिबिर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चक्रधर ए. निखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन रा. से. यो. कार्यक्रम अधिकारी प्रा. महेंद्र डी. अक्कलवार आणि प्रा. अविनाश वि. चकिनारपूवार व सहकार्यक्रम अधिकारी प्रा. उमेश वरघणे आणि प्रा. डॉ. रुद्रप्रताप तिवारी यांनी केले.
कोविड -19 लसीकरण मोहीम यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी प्रा. संजय कुमार, डॉ. आशिष चव्हाण, प्रा. प्रतीक बेझलवार,. प्रा. जगदीश गभने, डॉ. संजय सिंग, डॉ. हरिओम सिंग तोमर, प्रा. शरद लखेकर, प्रा. पूनम चंदेल आणि ग्रंथपाल कु. नलिनी जोशी यांचे सहकार्य लाभले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत