Top News

माता महाकाली मंदीरामध्ये हंसराज अहीर यांचे उपस्थितीत महाआरती. #Chandrapur

चंद्रपूर:- कोरोना काळात शासन निर्देशानुसार बंद करण्यात आलेले राज्यभरातील धार्मिक स्थळे दि. 07 ऑक्टो. 2021 रोजी पासून शासनाच्या आदेशान्वये सुरू करण्यात आली. चंद्रपूर जिल्ह्याची आराध्य देवी माता महाकाली चे मंदीर सुरू झाल्यानंतर पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्राी हंसराज अहीर यांनी भाजपा महानगर पदाधिकारी, पक्षाचे नगरसेवक तसेच भक्तगणांसोबत महाआरती करून माता महाकालीचे दर्शन घेतले.

कोरोना काळात बंद करण्यात आलेली धार्मिक स्थळे सुरू करण्यासाठी प्रदेश भाजपा च्या वतीने शासनाकडे वारंवार मागणी करण्यात येत होती. भाजपाच्या माध्यमातून याकरीता आंदोलनात्मक भूमिका घेण्यात आली होती. या पाश्र्वभूमिवर राज्य शासनाने दि. 07 ऑक्टो पासून सर्व धार्मिक स्थळे सुरू करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार माता महाकालीचे मंदीर सुध्दा आजपासून भाविकांसाठी खुले करण्यात आल्यानंतर भाजपाच्या वतीने या मंदीरामध्ये महाआरती करण्यात आली.
याप्रसंगी भाजपा महानगरचे जिल्हाध्यक्ष डाॅ मंगेश गुलवाडे, माजी महापौर अंजलीताई घोटेकर, जिल्हा महामंत्राी राजेश मुन, भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष रघुवीर अहीर, महानगर महामंत्राी ब्रिजभुषण पाझारे, रवि गुरणुले, प्रकाश धारणे, किसान आघाडी जिल्हाध्यक्ष राजु घरोटे, राजेंद्र खांडेकर, नगरसेविका शिलाताई चव्हाण, शितल आत्राम, वंदना तीखे, डाॅ.भारती दुधाणी, मनोहर टहलीयानी, पुनम तिवारी, गौतम यादव, प्रशांत विघ्नेश्वर यांचेसह भाजपा महानगर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने