Top News

चंद्रपूर मनपासमोर पेटली शासनाच्या विधेयकाची होळी. #Chandrapur


(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
चंद्रपूर:- दिनांक 26 ऑक्टोबर 2019 रोजी महानगरपालिका चंद्रपूर समोर भूमिपुत्र ब्रिगेड तर्फे तीन वार्ड एक प्रभाग या विधेयकाची होळी करण्यात आली. महाराष्ट्रातील सर्वच महानगरपालिकांमध्ये तीन वार्ड एक प्रभाग तीन नगरसेवक अशी रचना करण्यात आली आहे, पण त्याचवेळी मुंबई महानगरपालिकेसाठी एक वार्ड एक नगरसेवक अशी पद्धत ठेवली आहे.

एक महाराष्ट्र एक नियम या धर्तीवर निर्णय अपेक्षित होते परंतु हा निर्णय सरळ सरळ सामान्य लोकांवर अन्याय करणारा आणि वास्तविक प्रभाग पद्धतीमध्ये क्षेत्र मोठे असल्याने वॉर्डाचा सर्वांगीण विकास साधला जाऊ शकत नाही, याउलट याचा फटका सामान्य नागरिकांना बसतो. आमची महाराष्ट्र शासनाला अशी विनंती आहे की जो निर्णय मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी घेण्यात आला तसेच एक वार्ड एक नगरसेवक महाराष्ट्रातील सर्व महानगरपालिकेसाठी लागू करण्यात यावा अशी मागणी भूमिपुत्र ब्रिगेडच्या डॉक्टर अभिलाशा गावतुरे यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवून करण्यात आली.
यावेळी चंद्रपूर महानगरपालिका समोर सोमवारी निदर्शने करीत विधेयकाची होळी करण्यात आली. याप्रसंगी ब्रिगेडचे डॉक्टर राजू ताटेवार, डॉक्टर राकेश गावतुरे, एडवोकेट प्रशांत सोनुले, विजय मुसळे, डॉक्टर सिराज खान, एडवोकेट प्रशांत गव्हाणे, श्रीकांत शेंडे, हेमंत भगत, सोनल भगत, छायाताई सोनुले, संगीताताई पेटकुले, रेखाताई लेनगुरे आणि शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने