एकाचा मृत्यू, अनेकजण गंभीर जखमी.
(आधार न्युज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) पौर्णिमा फाले, सावली
सावली:- आज सावली तालुक्यात कारवरील नियंत्रण सुटल्याने थेट कार आठवडी बाजारामध्ये घुसली. MH 34 A0375 गाडी नंबर ची कार बाजारात घुसल्याने एकच खळबळ उडाली होती. यात एकाचा मृत्यू तर या अपघातात सात लोक जखमी तर तीन गंभीर जखमी आणि चार किरकोळ जखमी झाल्याच वृत्त आहे. जखमींना ॲम्बुलन्स मध्ये ठेवताना शंकर मोहुर्ले राहणार खेडी यांचा मृत्यू झाला असून दोघेजण गडचिरोली तर बाकीचे ग्रामीण रुग्णालय येथे उपचार घेत आहेत.
पुढील तपास पोलीस निरीक्षक शिरसाठ यांच्या नेतृत्व मध्ये बोथे आणि लाटकर मेजर करीत आहेत.