परभणी-चंद्रपूर रोडवर भीषण अपघात; ट्रॅक्टरचे झाले दोन तुकडे. #Accident

Bhairav Diwase
(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
चंद्रपूर:- परभणी-चंद्रपूर राज्य महामार्गावर विठाई एसटी बस आणि ट्रॅक्टरचा आज दुपारच्या सुमारास भीषण अपघात झाला. कारला देवगावच्या हद्दीत एसटी बस आली असता विरुद्ध बाजूने येणाऱ्या ट्रॅक्टरला बसची जोरदार धडक बसली.
या अपघाताची भीषणता एवढी प्रचंड होती कि, यामध्ये ट्रॅक्टरच्या तोंडाचे जाग्यावरच दोन तुकडे झाले. मात्र, या अपघातात बस चालकाच्या प्रसंगावधानामुळे व सुदैवाने मोठी जीवितहानी टळली.
परभणी कडून चंद्रपुरकडे जाणारी परभणी-चंद्रपूर ही परभणी आगाराची विठाई एसटी बस क्र. एम एच १३ सी यु ७८२९ कारला देव येथे समोरून येणाऱ्या रिकाम्या ट्रॅक्टर-ट्रॉलीवर आदळली. हा अपघात एवढा भीषण होता की ट्रॅक्टरच्या तोंडाचे दोन तुकडे झाले परंतु सुदैवाने यात एसटी बस मधील किंवा ट्रॅक्टर वरील चालकास थोडेसे देखील खरचटले नाही.