Top News

बल्लारपूर रेल्वे स्टेशनवर रेल्वे पोलिसांनी पकडला गांजा. #Hemp


(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
चंद्रपूर:- विशाखापट्टणमहून दिल्लीला जाणाऱ्या आंध्रप्रदेश एक्स्प्रेसमधील वातानुकुलीत डब्ब्यातून लाखो रुपयांचा गांजा रेल्वे पोलिसांनी जप्त केला. गुरुवारी (ता. २१) दुपारच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या गांजाची किमत १३ लाख आठ हजार रुपये आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावार गांजा जप्त करण्याची ही पहिलीची वेळ आहे. हा गांजा रेल्वेच्या वातानुकुलीत डब्ब्यात कुणी ठेवला आणि तो कुठे जाणार होता याचा तपास आता रेल्वे पोलिस करीत आहे.
विशाखापट्टमनहून दिल्लीला आंध्रप्रदेश एक्स्प्रेस जाते. ट्रेन क्रमांक ०२८०५ या क्रमांकाची रेल्वे दिल्लीसाठी निघाली होती. या एक्सप्रेसमधून मोठ्या प्रमाणात गांजाची तस्करी केली जात असल्याची गुप्त माहिती लोहमार्ग पोलिसांच्या हाती लागली होती. ही रेल्वे बल्लारपूर रेल्वेस्थानकावर आली. रेल्वे येताच लोहमार्ग पोलिसांनी तपासणी सुरू केली.
वातानुकूलित डब्यातून मोठ्या प्रमाणात गांजा आढळून आला. त्याची अंदाजे किमत १३ लाख ८ हजार पन्नास रुपये इतकी आहे. नेमका हा गांजा कुठे नेला जात होता. याचा तपास लोहमार्ग पोलिस घेत आहे.
तस्कराने हा गांजा आठ बोरीमध्ये लपवून ठेवला होता. या मुद्देमालाची अंदाजे किम्मत १३ लाख ८ हजार पन्नास रुपये इतकी आहे. लोहमार्ग पोलिसांच्या वतीने इतक्या मोठ्या प्रमाणात गांजा जप्त केल्याची ही पहिलीची मोठी कारवाई आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात बेवारस स्थितीत गांजा कसा काय जातो? याचा शोध घेऊन तस्करीच्या मुळापर्यंत तपास करून गांजा तस्करीच हे घबाड कायमच नष्ट करण्याचा मोठे आवाहन आता लोहमार्ग पोलिसांसमोर उभे आहे. ही कारवाही लोहमार्ग पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये प्रभारी पोलिस अधिकारी दयानंद सरवदे, मंडलवार, राजेश ठाकरे, हनवते, वासेकर, यावले, लोणारे, किरण काळबांडे आणि श्वान सिकंदर यांचा समावेश आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने