सोयाबीन काढत असताना थ्रेशर मशीनमध्ये अडकल्याने शेतमजुराचा मृत्यू.#Death

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- थ्रेशरवर सोयाबीन काढत असताना थ्रेशरमध्ये सापडल्याने शेतमजुराचा मृत्यू झाल्याची घटना राजुरा तालुक्यातील गोयेगाव शेतशिवरात आज सकाळच्या सुमारास घडली. माथरा येशील रहिवासी रामकिसन रामदास धोटे (४०) असे मृतकाचे नाव आहे. #Adharnewsnetwork
सध्या शेतात सोयाबीन काढणीचे काम सुरू आहे. अलीकडे सोयाबीन काढणीसाठी थ्रेशरचा वापर केला जातो. रामकिसन रामदास धोटे हा सकाळच्या सुमारास मधुकर ताजणे यांच्या शेतात थ्रेशर मशीनमध्ये सोयाबीनच्या पेंढ्या टाकत असताना अचानक तो मशीनमध्ये ओढून दबल्या गेल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
सदर घटनेची माहिती राजुरा पोलिसांना देण्यात आली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास पोलिस करणार आहेत. मृतकाच्या पश्चात पत्नी एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे.  या घटनेमुळे माथरा व परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.#Death