जाहिरात... Advertisement... विज्ञापन

रोटरी क्लब भद्रावती तर्फे 17 ऑक्टोबरला नि:शुल्क अस्थीरोग, दंतरोग निदान शिबिराचे आयोजन. #Bhadrawati

18 ऑक्टोबरला "मिशन कवचकुंडल अभियान" लसीकरण शिबिराचे आयोजन.

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- रोटरी क्लब भद्रावती तर्फे नि:शुल्क अस्थिरोग, दंतरोग निदान व लसीकरण शिबिराचे आयोजन दिनांक 17 व 18 ऑक्टोबरला स्थानिक हुतात्मा स्मारक येथे सकाळी 9 ते 3 च्या दरम्यान करण्यात आले आहे. #Adharnewsnetwork

दिनांक 17 रोज रविवार ला नि:शुल्क अस्थिरोग व दंतरोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून अस्थिरोग तज्ञ टोंगे फॅक्चर एक्सिडेंट हॉस्पिटल चंद्रपूर चे डॉक्टर निखिल टोंगे व स्माईल केअर फॅमिली डेंटल क्लिनिक चंद्रपूरच्या डॉक्टर श्रुती टोंगे (निब्रड) उपस्थित राहणार आहे. मुख्यत्वेकरून या शिबिरात हाडांचा ठिसूळपणा यावर भर दिला जाणार आहे.

तसेच दिनांक 18 रोजी सोमवारला लसीकरण शिबिराचे आयोजन हुतात्मा स्मारक येथे सकाळी नऊ ते तीन दरम्यान करण्यात आले आहे .नगर परिषद भद्रावती व ग्रामीण रुग्णालय भद्रावती यांचे लसीकरण शिबिरासाठी सहकार्य राहणार आहे. शासकीय नियमानुसार या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून लसीकरण न झालेल्यांनी व दुसरा डोस न घेतलेल्यानी लसीकरण करून घ्यावे असे आवाहन रोटरी क्लब भद्रावती चे अध्यक्ष सचिन सरपट्वार, सचिव अब्बास अजानी यांनी केले आहे.

सदर दोन्ही शिबिरासाठी संपर्क साधावा.

सचिन सरपटवार 9922930147

अब्बास अजानी 7020540024

भाविक तेलंग 9860796412

प्रवीण महाजन 8788759456

किशोर खंडाळकर 9822702301

यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत