जाहिरात... Advertisement... विज्ञापन

मित्रासोबत पोहायला जाण बेतले जीवावर.... #Death

पंधरा वर्षीय युवकाचा नाल्यात बुडून मृत्यू.
(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
चंद्रपूर:- गावालगतच्या नाल्यात पोहायला गेलेल्या दोघा मित्रापैकी एकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज मंगळवारी दुपारच्या सुमारास चंद्रपूर पासून जवळच असलेल्या घुग्घूस लगतच्या चिंचाळा नाल्यात घडली. चेतन उर्फ चंद्रहास उसनेकर (वय 15) असे मृतकाचे नाव आहे.
घुग्घुस लगतच्या पडोली पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या चिंचाळा येथील दोघे मित्र दुपारच्या सुमारास फिरत फिरत गावालगतच्या नाल्यात पोहायला गेले. दोघेही पोहण्याकरीता नाल्यात उतरले. त्यापैकी चेतन उसनेकर याला खोल भागातील पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. सोबत असलेला मित्र गौरव मारोती भेलके (वय ११) रा. सहकार नगर हा बचावला.
त्याने सदर घटनेची माहिती गावात येऊन सांगितली. प्रतिष्ठित व्यक्ती प्रकाश शेंडे व त्यांच्या सहकऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यांनी घटनास्थळी येऊन युवकाचा मृतदेह पाण्याबाहेर काढला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत