Top News

पोंभूर्ण्यात वनजीव सप्ताह निमित्य बांधला वनराई बंधारा. #Pombhurna #VanraiBandhara


वनविभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे स्तुत उपक्रम.
पोंभूर्णा:- पोंभूर्णा वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत १ आक्टोंबर ते ७ आक्टोंबर पर्यंत वन्यजीव सप्ताहानिमित्त पोंभूर्णा वनक्षेत्रात वनविभागाने वन्यजीवांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी वनराई बंधारा बांधून वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात आला.

पोंभूर्णा वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत वन्यजीव सप्ताहानिमित्त अनेक जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात येत आहेत. वन्यजीव, झाडांचे संवर्धन व संरक्षण.तसेच जनजागृती व प्रबोधनपर प्रभात फेरी असे उपक्रम राबविले जात आहेत. या सप्ताहानिमित्त पोंभूर्णा वनक्षेत्रातील कक्ष क्रमांक ९५ मध्ये वन्यजीवांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याच्या दृष्टीने, पाणी अडवा पाणी जिरवा या संकल्पना राबवीणे संबंधित पोंभूर्णा वनपरिक्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी यांनी वनराई बंधारा बांधला. सदर बंधाऱ्यामुळे वन्यजीवांना पिण्याच्या पाण्याची सोय होणार आहे.
यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी आम्रपाली खोब्रागडे, पोंभूर्णा क्षेत्र सहाय्यक ए. एस.कोसरे, घोसरी क्षेत्र सहाय्यक अजय बोधे, वनरक्षक प्रशांत शेंडे, दुषांत रामटेके, अजय ढवळे, सुरेंद्रकुमार देशमुख, सुरज मेश्राम, राजेंद्र मेश्राम, शितल कुळमेथे, सातपुते व वनकर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने